
सासरवाडीला निघाला होता जावई
घुलेवस्ती येथे झाला अपघात!
संजय हुलगे
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/माळशिरस:
माळशिरस तालुक्यातील घुलेवस्ती येथे दोन मोटार सायकलची समोरासमोर धडक होऊन मोटार सायकलवरील दोघेजण ठार झाल्याची घटना आज सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास घडली.
याबाबत पोलीस सुत्राकडुन मिळालेली माहिती अशी की,हणुमंत शंकर बेलदार (वय ४२ ) रा.सांगवी ता.फलटण जि.सातारा हे आपल्या बुलेट मोटार सायकल क्र. एम.एच. ११ सी.के. २७२७ वरुन आपली सासरवाडी जत जि. सांगलीकडे निघाले होते.तर माळशिरस येथील रावसाहेब सिद ( वय ४५ ) हे आपले शेतातील काम करून खुडूसकडून माळशिरसकडे आपल्या फॅशन प्रो मोटार सायकल क्र एम एच ४५ सी ४९९३ वरून येत होते. पुणे-पंढरपूर पालखी मार्गावर घुलेवस्तीजवळ दोन्ही मोटार सायकलची समोरासमोर धडक झाली. ही धडक एवढी जोरात झाली की, अपघातात दोन्ही मोटार सायकलचालक जागेवरच ठार झाले. हणुमंत बेलदार हे फलटण एस.टी.आगारात चालक म्हणून काम करीत होते.


संबंधित बातम्या
मटण खायला घालत नाही म्हणून मुलाने केला बापाचा खून
कॅम्पमध्ये गुन्हेगाराचा खून
पिलीव गावात एकाच रात्री चार घरफोड्या