प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/ जत:
निगडी खुर्द येथे मयत तुकाराम ताटे खून प्रकरणातील आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पुणे येथे बेड्या ठोकल्या.
दिनांक २६.७.२०२१ रोजी निगडी ते बनाळी रस्त्यालगत त्यांच्याच शेतात तुकाराम ताटे यांचा खून झाला होता.याबाबत जत पोलीस ठाण्यात भाऊ नामदेव शिवाजी ताटे यांनी फिर्याद दिली होती.त्या अनुषंगाने गोपणीय बातमीदारामार्फत माहिती मिळवत पोलीस निरीक्षक सर्जेराव गायकवाड,पोलीस निरीक्षक आप्पासाहेब कोळी,सहायक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस,जितेंद्र जाधव, राजु मुळे, संजय काबळे,अनिल कोळेकर,संदीप नलवडेयांच्या पथकाने चक्रे फिरवत आरोपींना बेड्या ठोकण्यात यश आले आहे.
यामध्ये आरोपी सुरेश कारभारी हिरगोड (वय ३० रा. ठरवडी ता. मुळशी जि. पुणे),अनिल सुरेश काळेल (वय २९ रा. उरवडी ता. मुळशी जि. पुणे),रामेश्वर निळकंठराव जोगदंड (वय ५४ रा. उरवडी ता. मुळशी जि. पुणे (मुळ गाव नरवडी ता. सोनपळे जि. परभणी),तानाजी रावसाहेब जाधव (वय ४५ रा.निगडी खुर्द ता. जत जि. सांगली) यांना ताब्यात घेतले तर विजय कराळे (रा.उरवडी ता.मुळशी जि. पुणे) हा पसार झाला आहे.
दिनांक २६ रोजी ०४.३० वा दरम्यान जत पोलीस ठाणे हदीत निगडी खुर्द ता. जत गावच्या हद्दीत निगडी ते बनाळी जाणाऱ्या रोडलगत मयत तुकाराम ताटे यांचे शेतातील घरात अज्ञात इसमानी अज्ञात कारणावरुन मयत तुकाराम ताटे याचा धारदार हत्याराने छातीवर, पाठीवर, पोटावर, उजव्या हाताच्या मनगटावर,हाताच्या पंज्यावर, बोटावर, डाव्या हाताच्या दंडावर,गुडघ्यावर वार करून गंभीर जखमी करून त्याचा खून केल्याबाबत जत पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक दिक्षीत गेडाम,अपर पोलीस अधीक्षक मनिषा दुबुले ,जतचे उपविभागीय पोलीस अधिकारी रत्नाकर नवले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक आप्पासाहेब कोळी, पोलीस निरीक्षक सर्जेराव गायकवाड यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस व त्यांचा टीमने गुन्ह्यांच्या ठिकाणी भेट दिली.
ताटे हा एकटाच राहत असून त्याचे शेजारी कोणतीही वस्ती, कोणताही पुरावा नव्हता. त्यावेळी सपोनि फडणीस यांनी मयत तुकाराम ताटे याची मागील गोपणीय माहिती घेतली. त्यावरुन मयत तुकाराम ताटे याचा काही दिवसापूर्वी तानाजी जाधव (निगडी खुर्द ता. जत जि. सांगली) याचेकडे विजय कराळे हा त्याचे आयशर टेम्पो घेऊन कामानिमित्त आला होता. त्यावेळी तानाजी जाधव याचे शेतात विजय कराळे हा याचा आयशर टेम्पो अडकला व तो बाहेर निघत नव्हता. त्यावेळी तानाजी जाधव, विजय कराळे यांनी मयत तुकाराम ताटे याचे मालकीच्या शेतातुन माती काढून त्या आयशर टेम्पो अडकला त्याठिकाणी मयत तुकाराम ताटे यास न विचारता टाकली. म्हणून त्यांच्यामध्ये जोरदार वाद झाला होता. या अनुषंगाने सपोनि रविराज फडणीस यांनी तपास केला असता संशयीत म्हणून तानाजी जाधव यांना ताब्यात घेऊन त्याचं नाव गाव विचारता त्याने आपले नाव तानाजी रावसाहेब जाधव (वय ४५ रा. निगडी खुर्द ता जत जि सांगली) असे सांगितले. त्याचेकडे या गुन्ह्याच्यख अनुषंगाने चौकशी केली असता,काही दिवसापूर्वी विजय कराळे हा त्याचा आयशर टेम्पो माझ्याकडे आला होता. त्यावेळी माझा, विजय कराळे याचा वाद मयत तुकाराम ताटे याचे सोबत झाला होता.याचा राग मनात धरुन विजय कराळे याने त्याचे मित्रास बोलावून त्याचा खुन केला असल्याचे सांगितले. विजय कराळे याचे मित्र हे उरवडी ता. मुळशी जि. पुणे येथे असल्याचे सांगितले. त्याप्रमाणे सपोनि रविराज फडणीस व त्याचा स्टाफ हे उरवडी ता.मुळशी जि. पुणे येथे जाऊन या तिघांना ताब्यात घेऊन त्याचं नाव गाव विचारता त्यानी आपले नाव १) सुरेश कारभारी हिरगोड वय-३० रा, उरवडी ता मुळशी जि पुणे २) अनिल सुरेश काळेल वय २९ रा. रा. उरवडी ता मुळशी जि पुणे ३) रापेश्वर निळकंठराव जोगदंड वय ५४ रा, उरवडी ता मुळशी जि पुणे (मुळ गाव नरवडी ता सोनपळे जि परभणी ) असे असल्याचे सांगितले. त्यावेळी त्या तिघांना सपोनि रविराज फडणीस यांनी त्याचेकडे खुनाच्या गुन्हयाचे अनुषंगाने चाकशी केली असता त्यांनी सांगितले की, मित्र विजय कराळे रा,उरवडी ता मुळशी जि. पुणे यांचा वाद मयत तुकाराम ताटे रा. जत निगडी खुर्द जवळ वाद झाला असे सागितलं. यावरुन त्याचा राग मनात धरून मित्र विजय कराळे व आम्ही सर्वांनी मिळून त्याचा खून केला असल्याचे सांगितले.त्यावेळी सपोनि रविराज फडणीस यांनी सर्वांना ताब्यात घेऊन पुढील तपासकामी जत पोलीस ठाणे येथे हजर करण्यात आले आहे.पुढील तपास जत पोलीस ठाण्याचे अधिकारी करीत आहेत.

संबंधित बातम्या
मटण खायला घालत नाही म्हणून मुलाने केला बापाचा खून
कॅम्पमध्ये गुन्हेगाराचा खून
पिलीव गावात एकाच रात्री चार घरफोड्या