संजय हुलगे
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/माळशिरस :
गोरडवाडी व इस्लामपूरचे माजी सरपंच, माजी उपसभापती माणिकराव कर्णवर-पाटील (वय ८७) यांचे ४ ऑगस्ट रोजी रात्री १.३० वाजता दुःखद निधन झाले.
माळशिरस पंचायत समितीचे 11 वर्ष उपसभापती, गोरडवाडी विकास सोसायटीचे 35 वर्षे चेअरमन, कृषी उत्पन्न बाजार समितीचे ३ वर्षे उपसभापती ,शंकर सहकारी साखर कारखाना सदाशिवनगर येथे संचालक म्हणून त्यांनी काम पाहिले .सोलापूर जिल्हा नियोजन समितीच्या सदस्य पदावरही त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटविला असून अशा अनेक पदावरती त्यांनी प्रामाणिकपणाने काम केले.
त्यांच्या पश्चात पत्नी,३ मुले, २ मुली, ३ नातु,४ नाती, ३ सुना असा परिवार आहे. माजी सरपंच भागवत मल्हारी कर्णवर – पाटील यांचे ते चुलते होते.त्यांच्या निधनाने गोरडवाडी गावावर शोककळा पसरली आहे.तसेच परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

संबंधित बातम्या
वसंतराव काळे प्रशालेच्या मुलींच्या खो-खो संघाला तिहेरी मुकुट
*ज्येष्ठांचा सन्मान घोषणामध्ये नव्हे, जगण्यात दिसायला हवा !सादिक खाटीक
१ ऑक्टोबरला !आमदारांच्या दारात “पिठलं -भाकरी ठिय्या आंदोलन!”सादिक खाटीक यांची माहिती