माळशिरस येथे महसूल दिन साजरा

संजय हुलगे
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/माळशिरस :

माळशिरस तहसिल कार्यालय येथे अखिल भारतीय ग्राहक पंचायत तालुका माळशिरस यांच्या वतीने महसूल दिन साजरा करण्यात आला. तहसीलदार जगदीश निंबाळकर यांचा सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी म्हणाले, तालुक्याच्या विकासाच्या विविध योजना व विषय आपण नेहमीच उत्तम प्रकारे हाताळत आहात, परंतु मागील दोन वर्षापासून कोरोना महामारीमुळे आपत्ती व्यवस्थापनासाठी आपली बरीच ऊर्जा खर्ची पडत आहे. अतिवृष्टी, निवडणुका, इ. कामांमध्ये आपले कर्मचारी भरीव कामगिरी करीत आहेत. या सर्व कार्यासाठी आपणास प्रेरणा, नवऊर्जा मिळत राहो ही प्रार्थना! महसूल दिनानिमित्त शासनाकडून नवीन सुरू झालेल्या ऑनलाईन पीकपाणी नोंदणी प्रकल्पासाठीही शुभेच्छा दिल्या!
यावेळी तालुका अध्यक्ष उपेंद्र केसकर,तालुका उपाध्यक्ष वामनराव वाघमोडे ,तालुका संघटक राजाभाऊ पिसे, सचिव सचिन पवार ,प्रसिद्धी प्रमुख पत्रकार संजय हुलगे ,ऊर्जा विभाग प्रमुख हरुण शेख, कार्यकारणी सदस्य कोरोना नियमाचे पालन करून अखिल भारतीय ग्राहक पंचायत माळशिरसचे पदाधिकारी उपस्थित होते.सर्व ग्राहकांना उचित सेवा द्यावी अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली .