देवराष्ट्रे येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/देवराष्ट्रे:
आपल्या प्रतिमेला, मराठी सारस्वताला समृद्ध करणारे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 101 व्या जयंती निमित्त त्यांच्या संदर्भाने आपल्या जीवनावरती अल्पशा प्रकाश टाकण्यासाठी त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून अण्णाभाऊ साठे फाउंडेशन च्या वतीने जयंती साजरी करण्यात आली.
यावेळी प्रतिमेचे पूजन दिलीप मिसाळ यांच्या हस्ते करण्यात आले व सुदाम मिसाळ यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले.
भिकाजी मिसाळ व संदीप मिसाळ यांच्या हस्ते श्रीफळ वाढवण्यात आले.
यावेळी बोलताना रमेश मिसाळ म्हणाले,दिड दिवसाची शाळा शिकलेला अण्णाभाऊ साठेंसारखा अक्षरशत्रू असलेला जीवनाचा पाईक लेखणीचे हत्यार बनतो. साहित्य हे समाज परिवर्तनाचे प्रचंड शस्त्र आहे,समोरच्या जगाला सर्वस्पर्शी व्यथा सागर आपल्या साहित्याच्या माध्यमातून अण्णाभाऊंनी मांडल्या.त्यांचे विचार आत्मसात करण्याची आवश्यकता आहे.
तसेच राजेश साठे यांनी अण्णाभाऊंच्या जीवनावर आधारित माहिती सांगून भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर, क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या विचारांशी अण्णाभाऊ साठेंचा असलेलं हे संधान या जन्मशताब्दी निमित्ताने सांगितले.
स्वागत प्रल्हाद मिसाळ यांनी केले. तर कार्यक्रमाचे आभार धनाजी मिसाळ यांनी मानले. यावेळी संतोष मिसाळ ,गोरख मिसाळ,अभिजीत मोरे ,सागर मिसाळ यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.