हिंदुराव खांडेकर
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/प्रतापूर:
जत तालुक्यातील प्रतापुर,धावडवाडी येथे आण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली.
लोकशाहीर,साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला.त्यानंतर ध्वजारोहण करण्यात आले.
संयुक्त महाराष्ट्र लढ्यातील एक महारथी,लोकशाहीर, साहित्यसम्राट तुकाराम भाऊ साठे उर्फ आण्णाभाऊ साठे यांनी 30 कादंबऱ्या व जवळजवळ 250 ते 300 कथा लिहिल्या.त्यांचे साहित्य 14 भाषेत भाषांतरित झाले.
प्रतापुर गावचे सरपंच माणिक हेगडे,माजी चेअरमन तुकाराम रामचंद्र खांडेकर,प्रतापुर ग्रामपंचायत शिपाई अंकुश हेगडे, मारूती आण्णा देसाई, प्रतापुरचे पोलीस पाटील धनाजी बंडगर, शिवाजी देवकुळे,तुकाराम हेगडे,रूपेश हेगडे,रोहित हेगडे,धावडवाडी गावचे सरपंच आप्पासो आवळे,ग्रामपंचायत शिपाई बशीर शेख,इसुफ शेख,अब्दुलकादर शेख उपस्थित होते.

संबंधित बातम्या
प्रवीण बागड़े यांना माफसूचा उत्कृष्ट अधिकारी पुरस्कार प्रदान
कुसमोड येथील कैलास घोंगडे या शेतकऱ्याच्या गाईवर तरसाच्या हल्लयात गाईचा मृत्यू
येळावीत रक्तदान शिबिरास युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद