वारणा धरणातून 22 हजार क्युसेस पाण्याचा विसर्ग
नदी काठच्या गावांनी सतर्क रहावे: जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी
जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज, नागरिकांनी घाबरु नये, अफवांवर विश्वासू ठेवू नये
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/ सांगली :
जिल्ह्यात व पाणलोट क्षेत्रात सुरु असलेल्या संततधार पावसामुळे धरणसाठ्यामध्ये पाण्याची वाढ होत आहे. दिनांक 22 जुलै 2021 रोजीच्या रात्री आठ वाजल्यापासून वारणा धरणातून 22 हजार क्युसेस पाण्याचा सुरु करण्यात येणार आहे. त्यामुळे नदी काठच्या गावातील नागरिकांनी सतर्क रहावे. अफवांवर विश्वासू ठेवू नये असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले आहे.
कृष्णा नदीवरील आयर्विंन पुलाची पातळी दिनांक 23 जुलै 2021 रोजी सकाळपर्यंत 35 फुटापर्यंत जाण्याची शक्यता असल्याचे सांगून जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील आपत्ती यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. ज्या ठिकाणी नागरिकांनां स्थलांतरीत करण्याची आवश्यकता आहे. अशा ठिकाणी त्यांना माहिती देऊन प्रशासनातर्फे स्थलांतरणाची कार्यवाही सुरु करण्यात आली आहे. तरी नागरिकांनी घाबरुन जाऊ नये. प्रशासनाकडून वेळोवेळी दिल्या जाणाऱ्या सूचनांचे पालन करावे.
पर्जन्यमानाचा विचार करता कोयना व वारणा धरणाच्या सध्याच्या विसर्गामध्ये वाढ होऊन पाणी पातळी वाढण्याची दाट शक्यता आहे. तरी नदी काठच्या विशेषत: वाळावा, शिराळा, मिरज, पलूस तालुक्यातील तसेच महानगपालिका क्षेत्रातील नदी काठावरील व सखल भागातील नागरिकांनी सावधानता बाळगावी व नदी पात्रात कोणीही जाऊ नये. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अधिकची सतर्क बाळगण्याचे आवाहनही जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले आहे.

संबंधित बातम्या
मोठी उपेक्षा पदरी आलेले खानापूरचे घरंदाज नेते – कै . किरणरावभैय्या माने
दै.प्रगल्भनायक,दि.04/06/2023 रोजीचा अंक
दै.प्रगल्भनायक,दि.03/06/2023 रोजीचा अंक