प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/ सांगली :
जिल्ह्यात व पाणलोट क्षेत्रात सुरु असलेल्या संततधार पावसामुळे जिल्ह्यातील पाण्याची पातळी वाढत आहे. कृष्णा नदीवरील आयर्विंन पुलाची पातळी दिनांक 23 जुलै 2021 रोजी सकाळ पर्यंत अंदाजित 35 फुटापर्यंत जाण्याची शक्यता सांगली पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता ज्योति देवकर यांनी वर्तविली आहे.
सांगली पाटबंधारे विभाग यांच्यावतीने नदी काठच्या गावातील ग्रामस्थ, शेतकरी सतर्क रहावे, असे आवाहन केले आहे. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, वेळोवेळी अद्यायावत माहितीचे निवेदन देण्यात येईल,असेही कळविले आहे. अधिक माहितीसाठी सांगली पाटबंधारे विभागाच्या पुर नियंत्रण कक्षातील दुरध्वनी क्रमांक 0233-2301820, 2302925 वर संपर्क साधावा.

संबंधित बातम्या
औषध विक्री दुकानांत सीसीटीव्ही बसवण्याचे आवाहन
सांगली जिल्ह्याच्या विकासासाठी वाढीव निधी देऊ – उपमुख्यमंत्री अजित पवार
दहिवडी न्यायालयाच्या वतीने राष्ट्रीय लोकअदालतीचे यशस्वी आयोजन