वारणा धरणातून 6 हजार क्युसेस पाण्याचा विसर्ग :कार्यकारी अभियंता ज्योति देवकर

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/ सांगली :
कृष्णा, कोयना व वारणा मुक्त पाणलोट क्षेत्रात पर्जन्यवृष्टी होत असल्याने दिनांक 22 जुलै 2021 रोजी सायकाळी 5 वाजेपर्यंत कृष्णा नदीवरील आयर्विन पुल येथील पाण्याची पातळी 24 फुट इतकी आहे. आज दिनांक 22 जुलै रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत प्रमुख धरणातील विसर्ग पुढील प्रमाणे आहे.
वारणा धरणातून 6 हजार 8 क्युसेस,
कोयना धरणातून 2 हजार 100 क्युसेस,
कण्हेर धरणातून 1 हजार 563 क्युसेस,
उमरोडी धरणातून 2 हजार 119 क्युसेस
इतका आहे. अशी माहिती सांगली पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता ज्योति देवकर यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.