
कोणत्या तालुक्यात किती मिमी पाऊस पडला?
जिल्ह्यात शिराळा तालुक्यात 154.3 मि.मी. पाऊस
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/ सांगली :
जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 59.6 मि. मी. पावसाची नोंद झाली असून शिराळा तालुक्यात 154.3 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
जिल्ह्यात गेल्या 24 तासात पडलेला पाऊस व कंसात 1 जुनपासून आत्तापर्यंत पडलेल्या पावसाची तालुकानिहाय आकडेवारी मि.मी.मध्ये खालीलप्रमाणे:
मिरज 36.2 (383.6),
जत 11.1 (344.4),
खानापूर-विटा 25.2 (257.5),
वाळवा-इस्लामपूर 75.7 (403.6),
तासगाव 35.6 (337.2),
शिराळा 154.3 (670.8),
आटपाडी 7.4 (242.0),
कवठेमहांकाळ 19.8 (194.1),
पलूस 60.3 (376.1),
कडेगाव 59.6 (298.4).
कालपासून वाळवा तालुक्यात व विशेषतः वारणा नदीच्या कॅच मेन्ट मध्ये सतत पाऊस चालू आहे.
- नदीचे पाणी पात्र भरून वाहत आहे. परंतु पात्र बाहेर नाही.
- ऐतवडे खुर्द – निलेवाडी पुलावर पाणी आले असून पुल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. तसेच पर्वतवाडी येथील परिस्थिती नियंत्रणात आहे.
- कणेगावकडून भरतवाडीकडे जाणाऱ्या रस्त्यावर दुपारपर्यंत पाणी येईल असा अंदाज आहे.
- शिराळा…मांगले कांदे पूल पाण्याखाली गेलेला आहे .वाहतूक बंद करण्यात आली आहे.
- नागठाणे बंधाऱ्यावर पाणी आले आहे.


संबंधित बातम्या
औषध विक्री दुकानांत सीसीटीव्ही बसवण्याचे आवाहन
सांगली जिल्ह्याच्या विकासासाठी वाढीव निधी देऊ – उपमुख्यमंत्री अजित पवार
दहिवडी न्यायालयाच्या वतीने राष्ट्रीय लोकअदालतीचे यशस्वी आयोजन