शाहू स्मारक उभारण्यासाठी निधी मिळावा : नगरसेवक अब्राहम आवळे
अनिल मदने
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/इचलकरंजी/जत: शिवतिर्थाप्रमाणेच आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराज यांचे शाहू स्मारक उभारण्यासाठी निधी मिळावा म्हणून शासनाकडे प्रस्ताव पाठवावा,अशी मागणी नगरसेवक अब्राहम आवळे यांनी इचलकरंजीच्या नगराध्यक्षा अलका स्वामी यांच्याकडे केली आहे.
पालिकेच्यावतीने रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाचे काम गतीमान झाले आहे. त्याप्रमाणे आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराज यांचे स्मारक उभा राहणे हे देखील प्रबोधनाच्या दृष्टीने महत्वाचे आहे.आरक्षणाची देशाला वाट दाखवून दुबळ्या माणासाचे संरक्षण करण्यासाठी संस्थानाचा राजदंड वापरणारा राजा म्हणून कागलपासून दिल्लीपर्यत शाहु महाराजांचे अवघ्या भरत खंडात कौतुक झाले. अशा राजांचे पालिकेने स्मारक उभारल्यास कर्तृत्वाचे, परक्रमाचे आकर्षण आणखी वाढत जाईल.
शाहू राजाच्या काळजात जातीची जागा माणुसकीने घेतली होती. त्यांच्या मनातून जात हद्दपार झाली होती. दुबळ्या माणसाचे कल्याण हे त्यांचे ध्येय होते. आरक्षणाचा जनक म्हणून शाहू महाराजांच्या पुतळ्याचे नुतनीकरण करणे अत्यावश्यक असून कारागीर, बलुतेदार व उपेक्षीत माणूस विकासाचा केंद्र बिंदु मानून त्याला दृष्टी देणाऱ्या वैभवशाली शाहू राजांना अभिवादन करण्यासाठी पालिकेने शाहू महाराजांचे स्मारक उभारण्यासाठी निधी मिळावा म्हणून शासनाकडे प्रस्ताव पाठवावा, अशा मागणीचे निवेदन नगरसेवक अब्राहम आवळे यांनी नगराध्यक्षांना दिले.
यावेळी नगरसेवक विठ्ठल चोपडे, मनोज साळुंखे, मंगेश कांबुरे उपस्थित होते.

संबंधित बातम्या
प्रवीण बागड़े यांना माफसूचा उत्कृष्ट अधिकारी पुरस्कार प्रदान
कुसमोड येथील कैलास घोंगडे या शेतकऱ्याच्या गाईवर तरसाच्या हल्लयात गाईचा मृत्यू
येळावीत रक्तदान शिबिरास युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद