के.के.पाटील यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा

संजय हुलगे
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/माळशिरस:

निमगाव म.(ता. माळशिरस) येथे भारतीय जनता पार्टीचे राज्य कार्यकारणी निमंत्रक सदस्य व सोलापूर जिल्ह्याचे सहप्रभारी के.के.पाटील यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला.

हार-तुरे,फेटे अशा गोष्टींना खर्च न करता निमगाव येथे  रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले. या रक्तदान शिबिरामध्ये १६१ रक्तदात्यांनी रक्तदान केले. रक्तदान करताना महिलांची उपस्थितीही लक्षणीय होती.के.के.पाटील मित्र मंडळाच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप, वृक्षारोपण करण्यात आले.रक्त संकलन करण्यासाठी अक्षय ब्लड बँक यांनी सहकार्य केले.समाजातील विविध स्तरातून  वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्याकरिता के.के. पाटील मित्रपरिवार,अमरभैय्या मित्र परिवार,अजित पाटील मित्र परिवार यांचे मोलाचे सहकार्य लाभले.