
दिव्यांग कर्मचाऱ्यांना सहाय्यक तंत्रज्ञान उपकरणांसाठी निधी मिळावा : शिक्षक संघ व अपंग विकास महासंघांचे मंत्री हसन मुश्रीफ यांना निवेदन
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/सांगली:
जिल्हा परिषद दिव्यांग कर्मचाऱ्यांना सहाय्यक तंत्रज्ञान उपकरणे उपलब्ध करून देण्यासाठी पूर्वी प्रत्येकी 50 हजार रुपये प्राप्त होत होते.आता एक लाख रुपये शासनाकडून मिळतात.या योजनेनुसार सांगली जिल्ह्यातील काही कर्मचाऱ्यांना सदर योजनेचा लाभ मिळाला आहे.परंतु सांगली जिल्ह्यामधील जत तालुक्यातील 34 दिव्यांग शिक्षक व वाळवा तालुक्यामधील 17 दिव्यांग शिक्षकांना जिल्हा परिषदेकडे निधी प्राप्त नसल्याने लाभ मिळाला नाही. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये काहीशी अशीच स्थिती निर्माण झाली आहे.
हा निधी ग्रामविकास विभागाकडून प्राप्त होत असल्याने महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ व राष्ट्रीय अपंग विकास महासंघ यांच्या वतीने ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांना लेखी निवेदनाद्वारे सर्वच दिव्यांग शासकीय कर्मचाऱ्यांना सहाय्यक तंत्रज्ञान उपकरणे घेण्यासाठीचा निधी राज्यातील जिल्हा परिषदांना उपलब्ध करून द्यावा अशी मागणी करण्यात आली.
यावेळी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे राज्याध्यक्ष राजाराम वरुटे, अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक महासंघ जुनी पेन्शन संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष धैर्यशील पाटील, कोल्हापूर जिल्हा शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष संभाजी बापट, सांगली जिल्हा शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष अमोल माने, सरचिटणीस राहुल पाटणे, अपंग विकास महासंघाचे विभागीय अध्यक्ष प्रकाश पवार, वाळवा तालुका शिक्षक संघाचे सरचिटणीस संभाजी ठोंबरे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

संबंधित बातम्या
वसंतराव काळे प्रशालेच्या मुलींच्या खो-खो संघाला तिहेरी मुकुट
*ज्येष्ठांचा सन्मान घोषणामध्ये नव्हे, जगण्यात दिसायला हवा !सादिक खाटीक
१ ऑक्टोबरला !आमदारांच्या दारात “पिठलं -भाकरी ठिय्या आंदोलन!”सादिक खाटीक यांची माहिती