आगामी अधिवेशनात माध्यमकर्मीबाबत ठोस भूमिका जाहीर करावी!
चौथ्या स्तंभाचे पाईक उपेक्षित! तातडीने आयोग गठीत करा!- एनयुजेमहाराष्ट्र
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/मुंबई:
माध्यमकर्मीबाबत धोरण, आरोग्य वीमा, महामंडळ,रजिस्ट्रेशन यासाठी तातडीने आयोग गठीत करावा असे निवेदन एनयुजेमहाराष्ट्र चे वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देण्यात आले आहे. त्याची प्रत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना देण्यात आली आहे, अशी माहिती सरचिटणीस सीमा भोईर यांनी दिली.
कोरोना आपत्कालीन कालाच्या सुरुवातीपासून एनयुजेमहाराष्ट्र चे वतीने पत्रकार व पत्रकारेत्तर कर्मचारी वर्गाचे सर्व सुरक्षेबाबत,आर्थिक सहायतेसाठी निवेदन सातत्याने दिली गेली! पत्रकार व पत्रकारेतर कर्मचारीवर्ग अत्यावश्यक सेवेतच येतो, मात्र अद्यापही सर्व माध्यमकर्मीना रेल्वेसह इतर सार्वजनिक वाहतूकीत प्रवासाची मुभा दिली गेली नाही.
कोरोना काळात जीवनावश्यक गमावलेल्या या कोरोना योद्ध्याचे कुटुंबियांना सरकारने 50 लाखांचा विमा जाहीर करूनही दिला नाही! …याची खंत कोषाध्यक्ष वैशाली आहेर यांनी व्यक्त केली.या कालावधीत नोकरी गेलेल्या ,पगार न देणे , अतिशय कमी पगार देणे असे अनेक प्रकारचे शोषण ,अत्याचार चौथास्तंभाचे श्रमिकांना सोसावे लागले व लागताहेत!
या आपत्कालीन स्थितीत अनेकांना मदत मिळते.मात्र चौथा स्तंभ उपेक्षित आहे! कारण चौथ्या स्तंभाचा उपयोग करणारेही सोईने वागतात हे वास्तव आहे!चौथ्या स्तंभाची नोंद असंघटित श्रमिक म्हणून केली जाणे आवश्यक आहे.त्यासाठी एक आयोग नेमून राज्याचे पत्रकार धोरण ठरवणे गरजेचे आहे! खऱ्या श्रमिक माध्यमकर्मीचा डाटा असणे हे अत्यावश्यक आहे,म्हणून रजिस्ट्रेशन मश्ट आहे।
जातीजमातीची महामंडळे होतात,ती उपेक्षितांना मदत करण्यासाठी ! चौथास्तंभ असंघटित व उपेक्षित आहे. हे भयंकर वास्तव आहे! कोरोना काळात हे सिद्ध झालेय की चौथ्या स्तंभाला नावं ठेवणारे ,दमन करणारे वाढले.मात्र सच्चा श्रमिकांना मदत करण्याचे धाडस कुणी करत नाही! हे लोकशाहीला घातक आहे! आगामी अधिवेशनात माध्यमकर्मीबाबतीत ठोस निर्णय जाहीर करावे आणि तातडीने सर्व विषय मार्गी लावावे अन्यथा आंदोलनाशिवाय पर्याय नाही असे स्पष्ट मत एनयुजेमहाराष्ट्र अध्यक्ष शीतल करदेकर यांनी व्यक्त केले!
संघटन सचिव कैलास उदमले, प्रवक्ते संदिप टक्के यांनी राज्यातील पत्रकार व पत्रकारेतर कर्मचारीवर्ग नाराज असून अनेकजण कठीण परिस्थितीत असूनही सरकार डोळेझाक करत आहे, याविरोधात राज्यभरात निषेध आंंदोलन करण्यात येईल असे सागितले!.

संबंधित बातम्या
‘मीडिया असोसिएशन ऑफ इंडिया’च्या पुणे विभागीय संघटन सहसचिवपदी लक्ष्मणराव खटके
प्रगल्भनायक दि.22/08/2023 रोजीचा अंक
प्रगल्भनायक दि.21/08/2023 रोजीचा अंक