ओबीसींच्या हक्कांसाठी २६ जून रोजी राज्यभर चक्काजाम !

आता माघार नाही;ओबीसींच्या हक्कांसाठी २६ जून रोजी राज्यभर चक्काजाम !

भाजपा ओबीसी मोर्चाचे सांगली जिल्हाध्यक्ष  विलासराव काळेबाग

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/सांगली:
महाभकास आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसींचे राजकीय आरक्षण संपुष्टात आले. या सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसींमध्ये अत्यंत संतप्त भावना आहेत. आरक्षणाचं हे न्यायालयीन पातळीवर लढलं जात असताना केवळ राज्य सरकारने प्रभावी बाजू न मांडल्याने आणि केवळ वेळकाढूपणा केल्यामुळे हे आरक्षण गेले.

भारतीय जनता पार्टीच्या प्रमुख नेत्यांची एक बैठक आज विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. यात सर्वांगिण चर्चेनंतर ओबीसी आरक्षणाच्या मागणीसाठी २६ जून रोजी राज्यभर चक्काजाम आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला. ओबीसींना हक्काचे आरक्षण मिळालेच पाहिजे आणि त्याशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ देणार नाही, ही भारतीय जनता पक्षाची भूमिका आहे.

हे आरक्षण देण्यासाठी राज्य सरकारला भाग पाडू आणि आवश्यकतेनुसार न्यायालयात जाऊ,अशी भूमिका घेण्यात आली आहे.

या बैठकीला ओबीसी मोर्चा प्रदेशाध्यक्ष योगेश टिळेकर, माजी मंत्री पंकजाताई मुंडे, चंद्रशेखर बावनकुळे, गिरीश महाजन, खा.रक्षाताई खडसे,अतुल सावे, डॉ. संजय कुटे, मनिषाताई चौधरी,जयकुमार गोरे, चित्राताई वाघ आणि इतर सहकारी उपस्थित होते.