प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/आटपाडी:
वाढत्या महागाईसंदर्भात आटपाडी तालुका वंचित बहुजन आघाडीच्या वतीने अध्यक्ष साहेबराव चंदनशिवे यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार यांना निवेदन देऊन केंद्र व राज्य सरकारचा तीव्र निषेध करण्यात आला.कोव्हिड 19च्या प्रादुर्भावाने संपूर्ण जगाला विळखा घातला असून या महामारीमुळे संपूर्ण देश लॉकडाऊन झाला. कष्टकरी, हातावरचे पोट असणारे व रोजंदारी करणाऱ्या जनतेचे गेली सव्वा वर्षे अतोनात हाल झाले आहे. त्यात बऱ्याच कंपनी बंद झाल्या तर काही कंपनीमध्ये कामगार कमी (कपात)करण्यात आले आहे.त्यातही गगनाला भिडणारी महागाई यामुळे सर्व जनता आपल्या कुटुंबाचे पोट कसे भरता येईल, मुला बाळांना व वयस्कर लोकांना जपणे व सांभाळणे सध्या जिकरीचे झाले आहे. त्यात लोकांना काम नाही ज्यांना आहे त्यांच्या पगारामध्ये कंपनीने कपात केलेली आहे.अशी परिस्थिती असताना केंद्र सरकारने व राज्य सरकारने पेट्रोल, डिझेल,गॅस,खाद्य तेल व इतर लागणाऱ्या जीवनावश्यक वस्तू महाग केलेल्या आहेत.तरी जीवनावश्यक वस्तू स्वस्त कराव्यात व जनतेस दिलासा द्यावा अन्यथा येत्या काळात संपूर्ण देशभर तीव्र आंदोलन करण्यात येईल,असा इशारा वंचित बहुजन आघाडी मार्फत देण्यात आला.
यावेळी आटपाडी तालुका वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष साहेबराव चंदनशिवे, शैलेंद्र आईवळे, सिनेकलाकार नवनाथ जावीर, अखिल भोसले,भिकाजी खरात, रोहन भिसे, नवनाथ सावंत, निवृत्ती खंदारे उपस्थित होते.

संबंधित बातम्या
‘मीडिया असोसिएशन ऑफ इंडिया’च्या पुणे विभागीय संघटन सहसचिवपदी लक्ष्मणराव खटके
प्रगल्भनायक दि.22/08/2023 रोजीचा अंक
प्रगल्भनायक दि.21/08/2023 रोजीचा अंक