अनिल मदने
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/जत:
शेगाव,वाळेखिंडी,बेवनूर (ता.जत) येथील जिल्हा नियोजन,नाबार्ड व मुख्यमंत्री सडक योजनेअंतर्गत मंजूर पाच रस्त्यांच्या कामाचे भूमिपूजन माजी आमदार विलासराव जगताप, माजी सभापती सुरेशराव शिंदे यांच्याहस्ते करण्यात आले.अनेक दिवसांपासून या रस्त्यांची मागणी होती.अखेर या रस्त्याचे मजबुतीकरण करण्यात येणार आहे.मुख्यमंत्री सडक योजनेतून शेगाव-चपरासवाडी,बेवनूर ते शिंदे (काळवळ मळा) तर जिल्हा परिषद सदस्या स्नेहलता जाधव यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या वाळेखिंडी ते जाधववस्ती,शेगाव मधील गुळवंची रोड तर नाबार्डमधून वाळेखिंडीतील महादेव मंदिर रस्त्यालगतच्या पूलाचे भूमिपूजन जगताप व शिंदे यांच्याहस्ते करण्यात आले. माजी आमदार विलासराव जगताप म्हणाले,जत भागातील अनेक वाड्यावस्त्यांचे रस्ते पक्के व डांबरीकरणाचे करण्याचे आमचे नियोजन होते.त्यासाठी आम्ही सरकारकडे पाठपुरावा केला होता.या रस्त्यांचे आता मजबुतीकरण होणार असून नागरिकांची सोय होणार आहे.यावेळी अजिंक्यतारा प्रतिष्ठानचे अध्यक्ष अॅड.प्रभाकर जाधव,माजी उपसभापती शिवाजी शिंदे,भाजपचे तालुकाध्यक्ष सुनिल पवार,प्रमोद सावंत,संरपच सौ.सुनीता महादेव माने, उपसंरपच सचिन बोराडे,दत्तात्रय व्हनमाने,संजय बुरूटे,किशोर बुरूटे,हणमंत माने,दिगंबर निकम,दादा पाटील,राजेंद्र नाईक आदि मान्यवर उपस्थित होते.शेगाव येथील रस्ता कामाचे भूमिपूजन करण्यात आले.

संबंधित बातम्या
वसंतराव काळे प्रशालेच्या मुलींच्या खो-खो संघाला तिहेरी मुकुट
*ज्येष्ठांचा सन्मान घोषणामध्ये नव्हे, जगण्यात दिसायला हवा !सादिक खाटीक
१ ऑक्टोबरला !आमदारांच्या दारात “पिठलं -भाकरी ठिय्या आंदोलन!”सादिक खाटीक यांची माहिती