अनिल मदने
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/जत:
जत तालुक्यात मंजूर असलेल्या १० रस्त्यांच्या कामांचा शुभारंभ व भूमिपूजन सोमवारी आमदार विक्रम सावंत यांच्याहस्ते करण्यात आले. एकाच दिवशी दहा कामांचा सपाटा आमदारांनी केल्याबद्दल नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे. मुख्यमंत्री व पंतप्रधान सडक योजना व आमदार स्थानिक निधीतील रस्त्यांच्या कामांचा शुभारंभ करण्यात आला. जुना राम १२५ ते तिप्पेहळळी इजीमा १८४ रस्ता सुधारणा करणे, रेवणाळ ते रेवणाळ रस्ता., शेगाव ते चपरासवाडी रस्ता, शेगाव ते अंतराळ रस्ता सुधारणा करणे, शेगाव ते पाटील व्हनमाने वस्ती सुधारणा करणे, बागलवाडी ते काशिलिंगवाडी रस्ता सुधारणा करणे, जत तालुक्यातील वाळेखंडी ते महादेवखडीकडे जाणारा रस्ता मध्ये फरशी पूल बांधणे,वाळेखिडी ते जाधववाडी ग्रामा ५३ सुधारणा करणे, बेवनूर ते शिंदे काळवळ मळा रस्ता, मौजे प्रतापूर ता.जत येथील मायक्का मंदिरासमोर ग्रामपंचायतमालकीच्या मोकळ्या जागेत सभा मंडप बांधणे, सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील अंकले बाज कंठी ते खांडसरी रस्ता मध्ये अंकले गावाजवळ लहान पूल बांधणे, डफळापूर ते सिंगणापूर रस्ता सुधारणा करणे, डफळापूर ते जायगव्हान रस्ता हद्द,सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील डोली हद्द डफळापूर रस्ता व डफळापूर गावाजवळ लहान पूल बांधणे, जिरग्याळ ते शेळकेवस्ती रस्ता करणे अशी कामे हाती घेण्यात आली आहेत. या सर्व कामांचे भूमिपूजन आमदार विक्रमसिंह (दादा)सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जत तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष अप्पाराया बिराजदार, माजी सभापती बाबासाहेब तात्या कोडग, जत तालुका काँग्रेस कमिटी कार्याध्यक्ष सुजय नाना शिंदे, जिल्हा परिषद सदस्य सरदार पाटील, माजी सरपंच मारुती पवार, युवा नेते नाथा पाटील, नगरसेवक भूपेंद्र कांबळे रेवनाळचे सरपंच धनाजी पाटील यांच्यासह त्या-त्या गावातील सरपंच सदस्य ग्रामस्थ उपस्थित होते.

संबंधित बातम्या
वसंतराव काळे प्रशालेच्या मुलींच्या खो-खो संघाला तिहेरी मुकुट
*ज्येष्ठांचा सन्मान घोषणामध्ये नव्हे, जगण्यात दिसायला हवा !सादिक खाटीक
१ ऑक्टोबरला !आमदारांच्या दारात “पिठलं -भाकरी ठिय्या आंदोलन!”सादिक खाटीक यांची माहिती