
संजय हुलगे
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/माळशिरस:

गोरडवाडी गावचे माजी उपसरपंच सुग्रीवआप्पा हुलगे यांच्या पत्नी यशोदा सुग्रीव हुलगे यांचे उपचारादरम्यान निधन झाले.
सुग्रीव हुलगे यांच्या दुःखाच्या प्रसंगी त्यांनी जोडलेली माणसे त्यांच्या दुःखात सामील झाली.पत्रकार संजय हुलगे यांच्या त्या चुलत वहिनी आहेत.हुलगे कुटुंबाचे सांत्वन करण्यासाठी तालुक्याच्या कानाकोपऱ्यातून अनेक लोक येत आहेत.गोरडवाडी गावचे माजी उपसरपंच सुग्रीव (आप्पा) हुलगे यांची सांत्वन पर भेट घेण्यासाठी माळशिरस तालुक्याचे आमदार रामभाऊ सातपुते, माजी उपसभापती अर्जुनसिंह मोहिते पाटील,माजी उपसभापती किशोर सुळ,किसान मोर्चा जिल्हा अध्यक्ष बाळासाहेब सरगर,भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस संजय देशमुख, पीए हरिभाऊ पालवे यांनी भेट दिली.तसेच राष्ट्रवादीचे नेते उत्तम जानकर ,पंचायत समिती सदस्य अजय सकट ,गौतम माने , माजी सरपंच लक्ष्मण गोरड,ग्रामपंचायत सदस्य पांडुरंग पिसे,माजी सरपंच भागवत कर्णवर,मच्छिंद्र कर्णवर ,विष्णू सरगर आदिंनी भेटी दिल्या.

संबंधित बातम्या
वसंतराव काळे प्रशालेच्या मुलींच्या खो-खो संघाला तिहेरी मुकुट
*ज्येष्ठांचा सन्मान घोषणामध्ये नव्हे, जगण्यात दिसायला हवा !सादिक खाटीक
१ ऑक्टोबरला !आमदारांच्या दारात “पिठलं -भाकरी ठिय्या आंदोलन!”सादिक खाटीक यांची माहिती