
संजय हुलगे
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/माळशिरस :
माळशिरस तालुक्यातील गोरडवाडी येथील यशोदा सुग्रीव हुलगे (वय ५५ वर्षे) यांनी ९ जुन रोजी ५.३० वाजता उपचारादरम्यान डॉ.एम.के.इनामदार यांच्या अश्विनी हॉस्पिटल,अकलूज येथे अखेरचा श्वास घेतला. प्रगतशील बागायतदार माजी उपसरपंच सुग्रीव साहेबराव हुलगे यांच्या त्या पत्नी होत्या.त्यांच्या पाश्चात २ मुले बिबिशन व विष्णू हुलगे, दिर तात्याबा हुलगे,किसन हुलगे,२ जावा, सासू , ३ पुतणे असा मोठा परिवार आहे.पत्रकार संजय हुलगे यांच्या त्या चुलत वहिनी होत्या.त्यांच्या निधनाने गोरडवाडी गावावर मोठी शोककळा पसरली आहे.परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.


संबंधित बातम्या
वसंतराव काळे प्रशालेच्या मुलींच्या खो-खो संघाला तिहेरी मुकुट
*ज्येष्ठांचा सन्मान घोषणामध्ये नव्हे, जगण्यात दिसायला हवा !सादिक खाटीक
१ ऑक्टोबरला !आमदारांच्या दारात “पिठलं -भाकरी ठिय्या आंदोलन!”सादिक खाटीक यांची माहिती