
माळशिरस तालुक्यातील पश्चिम भागाचे ज्येष्ठ नेते, गोरडवाडीचे माजी सरपंच नानासाहेब कर्णवर पाटील यांचे दुःखद निधन
श्री श्री सद्गुरू कारखाना राजेवाडीचे व्हाईस चेअरमन बाळासाहेब कर्णवर पाटील यांना पितृशोक
संजय हुलगे
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/माळशिरस :
गोरडवाडी गावचे माजी सरपंच नानासाहेब आबाजी कर्णवर पाटील यांनी मंगळवार ८ जून २०२१ रोजी पहाटे उपचारादरम्यान डॉ. एम. के. इनामदार यांच्या अश्विनी हॉस्पिटल, अकलूज येथे अखेरचा श्वास घेतला. श्री .श्री . सद्गुरु साखर कारखाना राजेवाडी या कारखान्याचे व्हाईस चेअरमन बाळासाहेब कर्णवर पाटील यांचे ते वडील होते.
माळशिरस तालुक्याच्या पश्चिम भागामध्ये मोहिते पाटील समर्थक असणारे निष्ठावान नेत्यांपैकी ते होते. स्व. नानासाहेब यांनी माळशिरस तालुका शेतकरी संघटनेचे अध्यक्ष पदावर काम केले. त्याचबरोबर माळशिरस तालुका स्वस्त धान्य दुकान संघटनेच्या अध्यक्षपदही भूषवले होते. गोरडवाडी गावचे ते माजी सरपंच होते. गोरडवाडी पंचक्रोशीमध्ये नानांनी आपल्या कार्यातून वेगळा ठसा उमटविला होता. अडचणीत असणाऱ्या लोकांना मदत करणे, गोरगरीब जनतेच्या सुख-दुःखात ते सामील होत.योग्य मार्गदर्शन करत, कितीतरी लोकांना त्यांनी अडचणीतून बाहेर काढलेले आहे. पूर्वीपासून त्यांचा स्वभाव बोलका व प्रामाणिक यामुळे त्यांनी आपल्या उद्योग व्यवसायामध्ये सुद्धा अनेक सहकार्यांना मदत केलेली आहे. समाजामध्ये आदराचे स्थान असणारे नाना यांना घरांमध्येही आदर होता. साधी राहणी, उच्च विचारसरणी नानांचे राहणीमान नेहमी स्वच्छ धोतर, तीन गुंड्याचा शर्ट आणि टोपी असा पेहराव असायचा.त्यांचा एकत्रीत मोठा परिवार होता. त्यांना भावंडे, (१ )पंढरीनाथ आबाजी कर्णवर , (२ )कै . नानासाहेब आबाजी कर्णवर यांना १ मुलगी , १ मुलगा ( ३ ) सदाशिव कर्णवर (४ ) महादेव कर्णवर ( ५ ) कै . तुकाराम कर्णवर (६ ) उत्तम कर्णवर गोरडवाडी गावचे स्वस्त धान्य दुकान चालवतात . (७ ) हनुमंत कर्णवर सह त्यांना बहिणी, पुतणे, पुतण्या, भाचे, भाची यांच्यामध्येही नानांच्या शब्दाला किंमत होती. नानांचे एक बंधू बऱ्याच वर्षापूर्वी वारलेले होते. त्यांच्या मुलांचे शिक्षण पूर्ण करून एक मुलगा पोलीस खात्यामध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून सोमनाथ तुकाराम कर्णवर पाटील कार्यरत आहेत तर. दुसरा पुतण्या इंजिनीयरिंग करून कॉन्ट्रॅक्टर आहे. तर एक डॉ . सारिका कर्णवर . नानांचे शिक्षण जेमतेम झालेले होते. मात्र, नानांना व्यवहारिक ज्ञान भरपूर होते. त्यांनी घरातील दुसरी व तिसरी पिढी सुसंस्कृत केलेली आहे. नानासाहेब यांचा गोरडवाडी गावच्या जडणघडणीमध्ये सिंहाचा वाटा आहे. आदर्शवत असणाऱ्या नेतृत्त्वाला गोरडवाडी परिसर मुकलेला आहे. नानांच्या जाण्याने कर्णवर पाटील कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

संबंधित बातम्या
वसंतराव काळे प्रशालेच्या मुलींच्या खो-खो संघाला तिहेरी मुकुट
*ज्येष्ठांचा सन्मान घोषणामध्ये नव्हे, जगण्यात दिसायला हवा !सादिक खाटीक
१ ऑक्टोबरला !आमदारांच्या दारात “पिठलं -भाकरी ठिय्या आंदोलन!”सादिक खाटीक यांची माहिती