ग्राफिक्स डिझायनर असोसिएशनच्या जिल्हाध्यक्षपदी संजय कोळेकर,उपाध्यक्षपदी तानाजी गोरड !

संजय हुलगे
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/माळशिरस  :

ग्रामीण भागातील गोरडवाडी गावचे सुपुत्र होतकरू आम्ही ग्राफिक्स डिझायनर असोसिएशन जिल्हा पातळी सोलापूर जिल्ह्याच्या अध्यक्षपदी संजय (दादा) कोळेकर यांची तर उपाध्यक्षपदी तानाजी गोरड यांची निवड झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले व त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या निवडीने ग्रामीण भागातील अनेकांचे  ग्राफिक्स डिझायनरचे काम करण्यासाठी जास्त पैसे मोजावे लागणार नाहीत,अतिजलद काम केले जाणार आहे. कमी वयात निवड झाल्याने  मला काम करण्याची संधी मिळाली आहे आणि गावाचे नाव जिल्हाभर पोचवणार असे बोलताना ते म्हणाले.