उद्यापासून ‘अनलॉक’ महाराष्ट्र!

उद्या सोमवार दि.७ जूनपासून महाराष्ट्र पाच टप्प्यात अनलॉक होणार!

कोणत्या स्तरात कोणत्या जिल्ह्यांचा समावेश?

काय बंद आणि काय सुरु राहणार?

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/ मुंबई:

राज्य सरकारने शुक्रवारी मध्यरात्री लॉकडाऊनचे नियम शिथिल करणारी नवीन नियमावली जाहीर केली. हे नवीन निर्बंध सोमवारपासून म्हणजे 7 जूनपासून लागू होणार आहेत. राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी याबाबत आदेश काढला आहे.

आठवड्याच्या सरासरीनुसार भरलेल्या ऑक्सिजन बेड्सचे प्रमाण आणि पॉझिटिव्हीटी रेट या आधारे प्रत्येक जिल्हा प्रशासन नियमावली संदर्भात स्वतंत्र आदेश काढतील. पण या दोन निकषांच्या आधारे नियमावली कशी असेल हे राज्य शासनाने निश्चित केले आहे. प्रत्येक आठवड्याला या दोन निकषांवर जिल्ह्यांची वर्गवारी करुन नियमावलीनुसार निर्बंध शिथिल करायचे की अधिक कडक करायचे याचा निर्णय घेतला जाणार आहे. एकूण 5 स्तरावर ही अंमलबजावणी होणार आहे. मुंबई, ठाणे, वसई-विरार, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, नाशिक, पुणे, पिंपरी-चिंचवड, औरंगाबाद, सोलापूर आणि नागपूर महापालिका हे स्वतंत्र प्रशासकीय युनिट समजण्यात येतील. म्हणजे या महापालिका प्रशासन आणि जिल्हा प्रशासन नियमावलीसंदर्भात स्वतंत्र आदेश आहे.

ज्या ठिकाणी 5 टक्क्यांपेक्षा कमी कोरोना पॉझिटिव्हीटी रेट आहे आणि 25 टक्क्यांपेक्षा कमी ऑक्सिजन बेड्स भरलेले आहेत तेथील सर्व व्यवहार खुले करण्यात येतील.हा पहिला स्तर मानला जाईल.

– 5 टक्क्यांपेक्षा कमी कोरोना पॉझिटिव्हीटी रेट आहे आणि 25 ते 40 टक्के ऑक्सिजन बेड्स भरलेले आहेत. याला दुसरा स्तर मानला जाईल.

– 5 ते 10 टक्के पॉझिटिव्हीटी रेट असेल आणि 40 टक्क्यांपेक्षा अधिक ऑक्सिजन बेड्स भरलेले असतील तर याला तिसरा स्तर मानला जाईल. याठिकाणचे व्यवहार सायंकाळी 5 वाजता बंद होतील.

– 10 ते 20 टक्के पॉझिटिव्हीटी रेट असेल आणि 60 टक्क्यांपेक्षा अधिक ऑक्सिजन बेड्स भरलेले असतील तर याला चौथा स्तर मानला जाईल. याठिकाणचे व्यवहार सायंकाळी 5 वाजता बंद होतील. तसंच शनिवार, रविवारी व्यवहार बंद असतील.

– 20 टक्क्यांपेक्षा अधिक पॉझिटिव्हीटी रेट असेल आणि 75 टक्क्यांपेक्षा अधिक ऑक्सिजन बेड्स भरलेले असतील तर याला पाचवा स्तर मानला जाईल.

– पहिल्या स्तरात मोडणाऱ्या भागांमध्ये मॉल, दुकानं, सिनेमा हॉल आणि सभागृहांच्या वेळेचे बंधन नसेल.

– दुसऱ्या स्तरात मोडणाऱ्या भागांमध्ये मॉल आणि सिनेमा हॉलमध्ये 50 टक्केच उपस्थितीची अट राहील.

– तिसऱ्या स्तरात मोडणाऱ्या भागांमध्ये दुकानं दुपारी 4 वाजेपर्यंत सुरु राहतील. सिनेमागृह, सभागृह, नाट्यगृह बंद राहतील.

– चौथ्या स्तरात मोडणाऱ्या भागांमध्ये जीवनावश्यक वस्तूंची दुकानं दुपारी 4 वाजेपर्यंत सुरु राहतील आणि अन्य दुकानं बंद राहतील.

– पाचव्या स्तरात मोडणाऱ्या भागांमध्ये जीवनावश्यक वस्तूंची दुकानं दुपारी 4 वाजेपर्यंत सुरु राहतील. शनिवार, रविवार ही दुकानं बंद राहतील.


 स्तर -1
अहमदनगर, चंद्रपूर, धुळे, गोंदिया, जळगाव, जालना, लातूर, नागपूर, नांदेड, यवतमाळ या 10 जिल्ह्यांमध्ये पहिल्या टप्प्यात अनलॉक करण्यात आलेला आहे. त्यामुळे या जिल्ह्यांमध्ये सर्व सेवा सुरळीत राहणार आहेत.- सर्व प्रकारची दुकानं पूर्ववत सुरु होणार, मॉल, दुकानं, मल्टिप्लेक्स, नाट्यगृह नियमितपणे सुरु होणार- लोकल सेवा पूर्ववत होईल, मात्र स्थितीनुसार स्थानिक आपत्ती व्यवस्थापन विभागाला निर्बंध घालण्याची मुभा असेल- जिम, सलू, ब्युटी पार्लर, स्पा, वेलनेस सेंटर्सना परवानगी, सार्वजनिक ठिकाणे, मैदाने खुली होतील- सार्वजनिक वाहतूक सेवा पूर्ववत होईल, इथे जमावबंदी नसेल- खासजी कार्यालये सुरु होती, तर शासकीय कार्यलये 100 टक्के क्षमतेने सुरु होतील – विविध खेळ, चित्रीकरण, सामाजिक, सांस्कृतिक मनोरंजनात्मक कार्यक्रमांनाही मुभा असेल – लग्नसोहळा, अंत्यविधी, बैठका, निवडणूक यावर कोणतीही बंधनं नसतील, या भागात जमावबंदी नसेल.

स्तर – 2

हिंगोली, नंदुरबार जिल्ह्यांचा समावेश आहे.

– 50 टक्के क्षमतेने रेस्टॉरंट सुरू राहतील
– मॉल्स आणि सिनेमगृह 50 टक्के सुरू राहतील- सार्वजनिक जागा , मैदाने, वॉकिंग ट्रॅक पूर्ण सुरू राहतील.- बांधकाम क्षेत्रातील पूर्ण कामे सुरू राहतील- कृषी क्षेत्रातील कामे पूर्ण सुरू राहतील- ई सेवा पूर्ण सुरू राहील- जिम, सलून, स्पा,वेलनेस सेंटर 50 टक्के क्षमतेने सुरू राहतील- बसेस बैठक क्षमता पूर्ण क्षमतेने सुरू राहतील- जिल्हयाच्या बाहेर खाजगी वाहन , बसेस, इतर राज्यात जाणारी लोकल सेवा, टॅक्सी यांना परवानगी आहे. मात्र पाचव्या स्तरातील जिल्ह्यात जाण्यासाठी ई पासची आवश्यकता असेल.

स्तर  – 3
मुंबई आणि उपनगर, ठाणे, नाशिक,औरंगाबाद, अकोला, अमरावती, बीड, भंडारा, गडचिरोली, उस्मानाबाद, पालघर, परभणी, सोलापूर, वर्धा, वाशिम या जिल्ह्यांचा समावेश आहे
.

– अत्यावश्यक सेवेतील दुकाने 7 ते 2 वाजेपर्यंत आणि इतर दुकाने सोमवार ते शुक्रवार 7 ते 2 वाजेपर्यंत सुरू राहतील अत्यावश्यक सेवा वगळता शनिवार आणि रविवार बंद राहतील- मॉल्स आणि सिनेमागृह पूर्णपणे बंद राहतील- हॉटेल्स 50 टक्के क्षमतेने सकाळी 7 ते 2 वाजेपर्यंत खुली रहातील. दुपारी 2 नंतर पार्सल सेवा सुरू राहिल. शनिवार आणि रविवार बंद राहतील.- सार्वजनिक उद्याने, मैदाने, वॉकिंग ट्रॅक, सायकलिंग ट्रॅक सकाळी 5 ते 9 यावेळेत सुरू रहातील- खाजगी आणि सरकारी कार्यालयात 50 टक्के क्षमतेने उपस्थिती राहील- इंडोर खेळले जाणारे स्पोर्ट्स बंद राहतील- सिनेमा चित्रीकरणाला स्टुडीओ मध्ये परवानगी असेल.- सामाजित, सांस्कृती, मनोरंजनात्म कार्यक्रमाला 50 टक्के क्षमतेने दुपारी 2 वाजेपर्यंत परवानगी राहील (सोमवार ते शुक्रवार)-लग्न सोहळे 50 जणांची उपस्थिती, अंत्यसंस्कार 20 जणांची उपस्थिती, इतर बैठका 50 टक्के उपस्थित राहील- कृषी क्षेत्रातील कामांना आणि ई कॉमर्स, बांधकाम क्षेत्रातील कामांना दुपारी 2 वाजेपर्यंत परवानगी राहील- दुपारी 2 वाजल्यानंतर जमावबंदी कायम राहिल

स्तर -4
पुणे, बुलढाणा, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांचा समावेश आहे
.

– अत्यावश्यक सेवेतील दुकाने 7 ते 2 वाजेपर्यंत (सोमवार ते शुक्रवार) उघडी राहतील
– अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकानं पुर्ण वेळ बंद रहातील- सिनेमागृह, मॉल पूर्णपणे बंद राहतील- हॉटेलमधील फक्त पार्सल सेवा सुरू राहील- सार्वजनिक उद्याने, मैदाने, वॉकिंग ट्रॅक, सायकलिंग ट्रॅक सकाळी 5 ते 9 सुरू रहातील (सोमवार ते शुक्रवार)- अत्यावश्यक सेवेतील खाजगी कार्यालयात फक्त 25 टक्के उपस्थिती राहील- शासकीय कार्यालयात 25 टक्के उपस्थिती- स्पोर्टसमध्ये आईटडोर सकाळी 5 ते 9 (सोमवार ते शुक्रवार) सुरु राहतील- कोणत्याही सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमालाल परवानगी नाही- लग्न सोहळ्यासाठी 25 लोकांची उपस्थिती, अंत्यसंस्कारसाठी फक्त 20 लोकांची उपस्थिती बंधनकारक- राजकीय किंवा इतर बैठका 50 टक्के क्षमता राहील- ज्या ठिकाणी कामगारांच्या रहाण्याची सोय आहे अश्याच ठिकानाची बांधकामं सुरू रहातील- कृषी कामे दुपारी 2 वाजेपर्यंत (सोमवार ते शुक्रवार) सुरू राहतील.- ई कॉर्मस फक्त अत्यावश्यक सेवेसाठी सुरू राहील-सलून आणि जीम 50 टक्के क्षमता सुरू राहील पण एसीचा वापर करता येणार नाही- बसेस 50 टक्के क्षमतेने सुरु राहील. उभे प्रवासी नाही- संचारबंदीचे नियम लागू राहतील

स्तर – 5
_सध्या पाचव्या टप्प्यात एकही जिल्हा नाही. जर पुढील आठवड्यात जास्त रुग्णसंख्य वाढली तर पाचव्या टप्प्यामध्ये समावेश होईल
.

कोणतं शहर, कोणत्या स्तरात?
जिल्हा- भरलेले ऑक्सिजन बेड (टक्के)     पॉझिटिव्हिटी दर (टक्के)   

पहिला स्तर
अहमदनगर २४.४८ ४.३०
चंद्रपूर ९.३० ३.०९
धुळे ४.२५ २.५४
गोंदिया ६.३२ २.३७
जळगाव १५.१७ १.६७
जालना १७.६५ २.०५
लातूर १५.१३ ४.२४
नागपूर ८.१३ ३.८६
नांदेड ४.२८ १.९३
यवतमाळ १३.५८ ४.१९

दुसरा स्तर
हिंगोली २९.३४ ४.३७
नंदुरबार २९.४३ ३.३१

तिसरा स्तर
मुंबई-उपनगर १२.५१ ५.२५
ठाणे १९.२५ ७.५४
नाशिक १८.७१ ७.७५
औरंगाबाद २०.३४ ५.३८
अकोला ४३.०४ ७.७४
अमरावती २८.५९ ६.५६
बीड ४७.१४ ८.४०
भंडारा ४.४१ ७.६७
गडचिरोली ५.९२ ६.५१
उस्मानाबाद ३१.०९ ७.७०
पालघर ४८.९३ ५.११
परभणी १६.०२ ७.१०
सोलापूर ४४.३९ ६.७८
वर्धा ४.०४ ७.५७
वाशिम १८.९० ५.१९

चौथा स्तर
पुणे २०.४५ १३.६२
बुलडाणा ७.७१ १०.०३
कोल्हापूर ७१.५० १५.२५
रायगड ३८.३० १९.३२
रत्नागिरी ५१.८१ १६.४५
सांगली ४७.९४ १४.०१
सातारा ६१.५५ १५.६२
सिंधुदुर्ग ६६.५६ १२.७०