प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/ सांगली:
येत्या सोमवार दि.७ जूनपासून महाराष्ट्रात पाच टप्प्यात अनलॉक करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात अठरा जिल्हे,दुसर्या टप्प्यात ५ ,तिसऱ्या टप्प्यात १० व चौथ्या टप्प्यात २ जिल्ह्यांचा समावेश असणार आहे. येत्या ७ जूनपासून अनलॉकची प्रक्रिया सुरु होणार आहे. या १८ जिल्ह्यात आता दुकानं, हॉटेल, सिनेमागृह, वाहतूक सर्व काही सुरु केले जाईल. तर दुसऱ्या टप्प्यात येणाऱ्या जिल्ह्यात 50 टक्के अनलॉक असेल. तिसऱ्या टप्प्यात सांगली, सातारा, सोलापूर, कोल्हापूर आदि जिल्ह्यांचा समावेश आहे. या जिल्ह्यांमध्ये पुढील बाबी सुरू राहणार आहेत.अत्यावश्यक दुकाने सकाळी ७ ते २ आणि इतर दुकाणे सोमवार ते शुक्रवार सकाळी ७ ते २ या वेळेत सर्व खुली राहतील. मॉल्स आणि थिएटर्स सर्व बंद राहतील. सोमवार ते शुक्रवार हॉटेल्स ५० टक्के खुली, दुपारी २ पर्यंत खुली राहतील. त्यानंतर पार्सल व्यवस्था असेल. ही सुविधा शनिवार व रविवारी बंद राहील. लोकल आणि रेल्वे बंद राहतील. माँर्निंक वॉक, मैदाने , सायकलिंग पहाटे ५ ते सकाळी ९ मुभा असेल. ५० टक्के क्षमतेने खासगी आणि शासकीय कार्यालय सुरू असतील. आऊटडोअर क्रीडा सकाळी ५ ते ९ सुरू, सोमवार ते शुक्रवार यादरम्यान सुरु असतील. स्टुडिओत चित्रीकरण परवानगी मात्र ते सोमवार ते शुक्रवार करता येईल. मनोरंजन कार्यक्रम ५० टक्के दुपारी २ पर्यंत खुले असणार हे सोमवार ते शुक्रवार यावेळेत घ्यावे लागतील. लग्नसोहळे ५० टक्के क्षमतेने तर अंत्यविधी २० लोकांना उपस्थित राहण्याची मुभा असेल. बांधकाम दुपारी दोन पर्यंत सुरु ठेवण्याची मुभा देण्यात आली आहे. शेतीविषयक सर्व कामे करता येतील. ई कॉमर्स दुपारी २ पर्यंत सुरु असेल. जमावबंदी आणि संचारबंदी कायम राहील.

संबंधित बातम्या
‘मीडिया असोसिएशन ऑफ इंडिया’च्या पुणे विभागीय संघटन सहसचिवपदी लक्ष्मणराव खटके
प्रगल्भनायक दि.22/08/2023 रोजीचा अंक
प्रगल्भनायक दि.21/08/2023 रोजीचा अंक