
सर्व माध्यमांतील पत्रकार व पत्रकारेत्तर कर्मचारी वर्गाचे रजिस्ट्रेशन व स्वतंत्र महामंडळ गठीत करावे;एनयुजेमहाराष्ट्र कोल्हापूर जिल्ह्याची मागणी
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/ कोल्हापूर:
प्रसारमाध्यमातील श्रमिक पत्रकार व पत्रकारेतर कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र महामंडळ गठीत करावे तसेच पत्रकारांचे रजिस्ट्रेशन करावे अशी मागणी नॅशनल युनियन ऑफ जर्नलिस्ट्स महाराष्ट्र संघटनेचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष डॉ.सुभाष सामंत यांचे नेतृत्वाखाली राज्याचे कामगारमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे केली आहे. राज्य अध्यक्षा शीतल करदेकर यांचे नेतृत्वाखाली ही महत्वपूर्ण भूमिका राज्य पातळीवर संघटनेने लावून धरली असून महाराष्ट्रातील जिल्ह्यातूनही या मागणीस पाठबळ मिळत आहे.तसेच देशपातळीवर एनयुजे इंडियाने पत्रकार रजिस्ट्रेशन हा महत्वपूर्ण विषय ऐरणीवर आणला आहे.कर्मच्याऱ्यांना कंत्राटी पद्धतीने व रोजंदारीवर काम करावे लागते. या प्रकारचा दुष्परिणाम असा कि किमान वेतन कायद्याची अंमलबजावणी करणेही सोयीस्करपणे टाळले जाते.या प्रकाराकडे मंत्री महोदयांचे लक्ष वेधण्याचे काम डॉ.सुभाष सामंत यांनी केले आहे. प्रसारमाध्यमात काम करणाऱ्या बहुतेक कर्मचाऱ्यांना जसे कि पत्रकारांना नियुक्त करताना त्यांच्याकडून राजीनामाही घेतला जातो. मात्र नियुक्ती किंवा अन्य कागदाच्या छायांकित प्रति संबंधित कर्मचाऱ्यांना दिल्या जात नाहीत. कायद्याच्या पळवाटा शोधून त्यांचे अवलंबन करूनच नियुक्त्या केल्या जातात. परिणामी बहुतेक पत्रकारांना व अन्य कर्मचाऱ्यांना कंत्राटी पद्धतीने व रोजंदारीवर काम करावे लागते. या प्रकारचा दुष्परिणाम कि किमान वेतन कायद्याची अंमलबजावणी करणेही सोयीस्करपणे टाळले जाते. श्रमिक पत्रकार हे आर्थिक विवंचनेस तोंड देत असताना त्यांना मानसिक तणाव, मेंदू व हृदयाचे विकार अशा समस्यांना सामोरे जातात. यामुळे श्रमिक पत्रकार व अन्य सर्वच प्रसारमाध्यमातील कर्मचारी बिकट अवस्थेतून जात आहेत.असा आशय निवेदनात नमूद केला असून, श्रमिक पत्रकार व पत्रकारेत्तर कर्मचाऱ्यांसाठी राज्य सरकारने स्वतंत्र महामंडळाचे गठन करावे अशी मागणी एनयुजे महाराष्ट्रचे मार्गदर्शक शिवेंद्रकुमारजी,राज्याध्यक्षा शीतलताई करदेकर व संघटन सचिव कैलास उदमले यांच्या मार्गदर्शनाखाली कोल्हापूर जिल्ह्याच्या शिष्टमंडळाने केली आहे. माध्यमकर्मीसाठी निश्चित धोरण आखण्याबाबत पुढीलप्रमाणे अपेक्षा कळविण्यात आल्या आहेत. १. आर्थिक सुरक्षा, आरोग्य सुरक्षा, नोकरी सुरक्षा आणि सामाजिक सुरक्षा याबाबत विचार होईल. २.दोन्ही बाजूनी सुसंवाद साधण्यासाठीचे एक व्यासपीठ तयार होईल.३.महाराष्ट्र सरकारने शंकरराव चव्हाण सुवर्णमहोत्सव समिती केली आहे. त्याच नावे हे महामंडळ झाल्यास उत्तम होईल. ४. महामंडळाच्या कार्यक्षेत्रात पत्रकार रजिस्ट्रेशन करणे, नियंत्रण, सुधारणा करणे अशी कामे यावीत. जेणेकरुन महाराष्ट्रातील हजारो श्रमिक पत्रकार व पत्रकारेतर कर्मचारी वर्गाला सर्व प्रकारच्या सुविधा आणि सहकार्याचा थेट लाभ घेता येईल आणि महाराष्ट्रातील हजारो माध्यमकर्मींंना दिलासा मिळेल. या निवेदनानंतर राज्याचे कामगार मंत्री सकारात्मक निर्णय घेतील,असा विश्वास श्रमिक पत्रकार व्यक्त करीत असून शासनाच्या आदेशाकडे लक्ष लागले आहे. निवेदनावर डॉ.सुभाष सामंत यांच्यासह कोल्हापूर जिल्हा सचिव शेखर धोंगडे, जिल्हा उपाध्यक्ष विनयकुमार पाटील, खजिनदार भूपेश कुंभार,हातकणंगले तालुका उपाध्यक्ष राजेंद्र शिंदे,कुबेर हंकारे,पत्रकार भारत जमणे,सागर जमणे,अमरराजे जगदाळे व समीर कटके आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

संबंधित बातम्या
‘मीडिया असोसिएशन ऑफ इंडिया’च्या पुणे विभागीय संघटन सहसचिवपदी लक्ष्मणराव खटके
प्रगल्भनायक दि.22/08/2023 रोजीचा अंक
प्रगल्भनायक दि.21/08/2023 रोजीचा अंक