मोहनराव पुजारी
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/आटपाडी:
मान्सून पाऊस चालू झाल्यामुळे वारा जोरात वाहत आहे. तसेच वीजा चमकून पाऊस पडत आहे. नागरिक राहत असलेल्या ठिकाणी वीज पडण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी,असे आवाहन आटपाडी ग्रामपंचायतीच्या लोकनियुक्त सरपंच व आपत्ती निवारण समितीच्या अध्यक्षा सौ.वृषाली धनंजय पाटील यांनी नागरिकांना केले आहे. त्या म्हणाल्या,’ज्या व्यक्तींना अशा आपत्कालीन परिस्थितीत रहायची-निवासाची सोय नसेल,त्यांनी आपल्या घराजवळ असलेल्या जिल्हा परिषद शाळेच्या खोल्यांमध्ये ही सोय करावी. त्यासाठी गरज पडल्यास संबंधित शाळेच्या शिक्षकाकडून चावी घेऊन शाळेत रहावे.चावी न मिळाल्यास आमच्याशी फोनद्वारे संपर्क करावा असेही आवाहन त्यांनी केले आहे. तसेच पावसामुळे नदी,नाले,ओढ्याला पूर येवून धोका होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदी,ओढा काठी कोणीही राहू नये.योग्य ती काळजी घ्यावी असेही त्या म्हणाल्या.

संबंधित बातम्या
वसंतराव काळे प्रशालेच्या मुलींच्या खो-खो संघाला तिहेरी मुकुट
*ज्येष्ठांचा सन्मान घोषणामध्ये नव्हे, जगण्यात दिसायला हवा !सादिक खाटीक
१ ऑक्टोबरला !आमदारांच्या दारात “पिठलं -भाकरी ठिय्या आंदोलन!”सादिक खाटीक यांची माहिती