माळशिरसमध्ये कोविड योद्ध्यांना सन्मानपत्र

संजय हुलगे 

प्रगल्भनायक न्युज नेटवर्क/ माळशिरस:

 पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांच्या सरकारला सप्तवर्षपूर्ती झाल्याबद्दल भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष डॉ.आप्पासाहेब देशमुख यांच्या वतीने राजमाता अहिल्यादेवी यांच्या प्रतिमेचे पूजन करुन विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले.ग्रामीण रुग्णालय माळशिरस व नगरपंचायत माळशिरस याठिकाणी  कार्यरत सर्व अधिकारी, पदाधिकारी व कर्मचारी या सर्वांना कोविड योध्दा सन्मानपत्र, शाल, वृक्ष व महिला कर्मचारी यांना साड्या भेट देऊन सन्मान करण्यात आले.यावेळी विश्वनाथ वडजे (मुख्याधिकारी), डॉ. स्मिता शिंदे (वैद्यकीय अधिकारी), विजय देशमुख, महेश बोत्रे, निलेश घाडगे, गणेश कुलकर्णी, प्राचार्य योगेश गुजरे आदी उपस्थित होते.