
मोहनराव पुजारी
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/ आटपाडी:
पश्चिम बंगालमधील महाराष्ट्रातील गलाई बांधवांना कोविड प्रतिबंधक लस देण्याबाबत आमदार अनिलभाऊ बाबर यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी पत्रव्यवहार केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्र्यांना संपर्क करून त्यांच्यामार्फत लस उपलब्ध करून लसीकरण करण्याची मागणी केली आहे.खानापूर,आटपाडी तालुक्यासह पश्चिम महाराष्ट्रातील अनेक गलाई व्यावसायिक व्यावसायाच्या निमित्ताने संपूर्ण देशभर पसरले आहेत. पश्चिम बंगालमध्येही मिदनापूर जिल्हा, बडा बाजार कोलकत्ता व इतर ठिकाणी अंदाजे तीस हजाराहून अधिक गलाई व्यावसायिक व कामगार स्थायिक आहेत. ते तेथील स्थानिक नागरिक नसल्यामुळे त्यांना कोविड प्रतिबंधात्मक लस उपलब्ध होत नाही. पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री यांना महाराष्ट्रातील गलाई बांधवांना कोविड प्रतिबंधात्मक लस उपलब्ध करून लसीकरण करण्याबाबतची मागणी आमदार अनिलभाऊ बाबर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

संबंधित बातम्या
‘मीडिया असोसिएशन ऑफ इंडिया’च्या पुणे विभागीय संघटन सहसचिवपदी लक्ष्मणराव खटके
प्रगल्भनायक दि.22/08/2023 रोजीचा अंक
प्रगल्भनायक दि.21/08/2023 रोजीचा अंक