
संजय हुलगे
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/ माळशिरस:
माळशिरस तालुक्यातील इस्लामपूर चौक ते भांबुर्डी हा रस्ताला मोठे खड्डे पडल्याने व रस्त्याच्या दोन्ही बाजूने काटेरी झुडपे उगवलेली असल्याने माळशिरसला येण्यासाठी नागरिकांंना प्रचंड त्रास होत आहे.
या रस्त्यातून माळशिरसला शासकीय कामासाठी भांब,गिरवी,कन्हेर,सरगरवाडी,इस्लामपूर,माणकी या गावातील ग्रामस्थांना व शेतकऱ्यांना या रस्त्याने धान्य विकण्यासाठी,ऊस नेण्यासाठी या रस्त्याची अत्यंत गरज आहे. शिवाय इस्लामपूर ते जाधववाडी हा रस्ता गेल्या वर्षी जानेवारीत पूर्ण झाला.परंतु या रस्त्यामध्ये मोठमोठे खड्डे पडले असून ठेकेदाराने खड्डे बुजवण्यासाठी रस्त्यावर ती खडी टाकूनसुद्धा दोन महिने झाले,परंतु दुरुस्ती झाली नाही.गेल्यावर्षी ऑगस्ट महिन्यात या रस्त्याने देशाचे नेते शरदचंद्र पवार, पालकमंत्री दत्तामामा भरणे, आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी कन्हेर या ठिकाणी भेट दिली होती. त्यानिमित्ताने तरी रस्ता दुरुस्त होईल अशी आशा होती. परंतु सुस्त प्रशासनाला कसलीही जाग आली नाही. कन्हेर चौकी ते सदाशिवनगर हाही रस्ता रहदारीचा असून गेली अनेक वर्ष या रस्त्याची दुरुस्ती झाली नाही. त्यामुळे मोठमोठे खड्डे आहेत. यावर्षी सदाशिवनगर कारखाना चालू झाला तर या रस्त्याने फार मोठी कसरत करावी लागेल, म्हणून या भागातील जनतेची माळशिरस तालुक्याला दोन आमदार व खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना एक लाखांचे मताधिक्य दिल्याने तालुक्यातील ही कामे मार्गी लागतील,अशी आशा सर्वसामान्य जनतेमधून व्यक्त केली जात आहे. पावसाळ्यापूर्वी हे रस्ते दुरुस्त व्हावेत,अशी या गावांच्या सरपंचाची मागणी आहे.

संबंधित बातम्या
वसंतराव काळे प्रशालेच्या मुलींच्या खो-खो संघाला तिहेरी मुकुट
*ज्येष्ठांचा सन्मान घोषणामध्ये नव्हे, जगण्यात दिसायला हवा !सादिक खाटीक
१ ऑक्टोबरला !आमदारांच्या दारात “पिठलं -भाकरी ठिय्या आंदोलन!”सादिक खाटीक यांची माहिती