म्युकर मायकोसिसचा जत तालुक्यात पहिला बळी

कोरोनावर उपचार घेताना दोन्ही डोळे झाले निकामी:सोन्याळ परिसरात खळबळ

अनिल मदने

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/जत:

कोरोनानंतर देशात डोकं काढलेल्या म्युकर मायकोसिस या बुरशीजन्य आजाराने जत तालुक्यातील सोन्याळ येथील एका 55 वर्षीय महिलेचा शनिवारी मृत्यू झाला. अंबव्वा धऱयाप्पा मुचंडी असे या मृत महिलचे नाव आहे. कोरोनाची लागण झाल्यानंतर उपचार सुरू असताना अचानक दोन्ही डोळे गेले,त्यानंतर बारा तासाच्या आताच महिलेच निधन झाले.दरम्यान,ग्रामीण भागामध्येही म्युकर मायकोसिसचा फैलाव झाल्याने नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.कोरोनाची दुसरी लाट विशेषत: ग्रामीण भागात पसरली असून मोठ्या प्रमाणात रूग्ण सापडत आहेत.मृत्यूचे प्रमाणही अधिक आहे. सध्या जत तालुक्यात कोरोना बाधितांचा आकडा दोनशेच्या वरती आहे. गावागावात आणि वाडा-वस्त्यांमध्ये याचा फैलाव झाला आहे. जिल्हात सर्वाधिक रूग्ण जत तालुक्यात सापडत असल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण झाले आहे. असे असताना देशात नव्याने आलेल्या म्युकरमायकोसिस या बुरशीजन्य रोगानेही डोकं वर काढले असून तालुक्यातील सोन्याळ (मुचंडी वस्ती) येथील अंबव्वा धऱयाप्पा मुचंडी या 55 वर्षीय महिलेचा या नव्या साथीच्या रोगाने मृत्यू झाला आहे.
कोरोनाची बाधा झाल्याने महिलेला पाच-सहा दिवसापूर्वी जत येथील कोव्हिड सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल केले होते.उपचार सुरू असताना तिसऱ्या दिवशी महिलेचा एक डोळा गेला.त्यानंतर दुसऱ्या दिवशी दुसरा डोळा गेला,तसेच संपूर्ण शरीर काळे पडले.त्यात बारा तासाच्या आतच महिलेचा मृत्यू झाला.ग्रामीण भागामाध्ये या बुरशीजन्य रोगाचा फैलाव झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.