प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/मिरज:
लॉकडाऊनच्या काळात रोजगार बंद, हाताला काम नाही ,रोजंदारीवर पोटपाणी चालणाऱ्यांच खाणंच बंद होऊ लागलं. याचा गांभीर्याने विचार करून पुरोगामी संघर्ष परिषदेचे पदाधिकारी यांनी स्वतः वर्गणी गोळा करून मिरज येथील समतानगरमध्ये दहा कुटुंबाना जीवनावश्यक वस्तूंचे किट वाटप केले. अन्यायाच्या विरोधात लढता लढता कोरोना महामारी पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाल्यानंतर रचनात्मक पद्धतीने मैदानात उतरून जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करुन एक आदर्श घालून दिला. या कार्यात पुरोगामी संघर्ष परिषदेचे महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष प्रा. सुभाष वायदंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पुरोगामी संघर्ष परिषदेचे सांगली जिल्ह्याचे उपाध्यक्ष खंडू कांबळे ,पश्चिम महाराष्ट्राच्या महिला आघाडी अध्यक्षा सौ.उषा सौंदडे,सांगली शहर जिल्हाध्यक्ष सौ.संगीता साठे, मिरज तालुका अध्यक्षा सौ.रतन लोखंडे,महापालिका क्षेत्राच्या अध्यक्षा.सौ ज्योती गोकाक, कुपवाड शहर अध्यक्षा सौ.शुभांगी साळुंखे,मिरज तालुका कार्याध्यक्ष सचिन साठे, अनिता गोकाक, पुरोगामी संघर्ष परिषदेचे वरिष्ठ उपाध्यक्ष सावळा खुडे(आण्णा) इत्यादी पदाधिकाऱ्यांनी सक्रिय सहभाग घेऊन सुनंदा आवळे, पल्लवी कांबळे,संगीता चांदणे,सुशीला चौरीनाथ, ईमा कांबळे, प्रतीक्षा घोरपडे या कुटुंबाला मदत केली. जिल्हा कार्यकारणी सदस्या सौ.अश्विनी कांबळे यांनी आभार मानले.

संबंधित बातम्या
प्रवीण बागड़े यांना माफसूचा उत्कृष्ट अधिकारी पुरस्कार प्रदान
कुसमोड येथील कैलास घोंगडे या शेतकऱ्याच्या गाईवर तरसाच्या हल्लयात गाईचा मृत्यू
येळावीत रक्तदान शिबिरास युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद