कुडणुरात आठ जणांचा मृत्यू!

जत तहसीलदार व प्रांताधिकारी यांनी केली पाहणी

अनिल मदने

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/ जत:

जत तालुक्यातील कुडणूर येथे मयत नागरिकांच्या नातेवाईकांची कोरोना तपासणी करण्यात येणार आहे. त्याशिवाय गावातील सर्व नागरिकांची तपासणीसाठी पथक नेमल्याचे‌ डफळापुरचे वैद्यकीय अधिकारी डॉ.अभिजीत चोथे यांनी सांगितले. दरम्यान प्रांताधिकारी प्रशांत आवटे व तहसीलदार सचिन पाटील यांनी कुडणुर गावास बुधवार दि.५ मे रोजी भेट देत माहिती घेतली.प्रांताधिकारी प्रशांत आवटे म्हणाले की, कुडणुर गावात ज्या आठ नागरिकांचा मृत्यू झाला होता,त्यांच्या घरी प्रत्यक्ष भेट दिली. गावचे सरपंच, पोलीस पाटील व इतर पदाधिकारी यांच्याशी चर्चा केली असता त्यांचे मृत्यू इतर कारणाने झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे गावातील कोणत्याही नागरिकांनी भीती बाळगू नये. तसेच गावातील २४ नागरिकांच्या कोरोणाच्या चाचणी केली असता एकही पॉजिटीव्ह व्यक्ती निघाली नाही. ज्यांना ताप, अंगदुखी किंवा इतर आजार असतील अशांच्या तपासण्या करण्याचे आदेश आरोग्य विभागाला दिले आहेत. तसेच ज्या आठ नागरिकांचा मृत्यू झालेला आहे, त्यांच्या घरातील सर्व नागरिकांची आरोग्य तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत.