
पलूस नगरपरिषदेच्या आरोग्य,विद्युत,पाणीपुरवठा विभागातील जुन्या कर्मचाऱ्यांचे नियमित सेवेत समावेशन करा अन्यथा वंचित बहुजन आघाडीचा तीव्र आंदोलनाचा इशारा
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क /पलूस:
पलूस नगरपरिषदेतील आरोग्य, पाणीपुरवठा व विद्युत विभागातील जुन्या कर्मचाऱ्यांचे तात्काळ कायम सेवेत समावेशन करावे अन्यथा कामगारांच्या न्याय व हक्कासाठी वंचित बहुजन आघाडी तीव्र आंदोलन करणार असलेचे निवेदन मुख्याधिकारी सुमित जाधव यांना वंचितचे जिल्हाध्यक्ष राजेश गायगवाळे यासह शिष्टमंडळाने दिले आहे. निवेदनात म्हटले आहे कि, 2016 साली पलूस नगरपरिषदची स्थापना झाली असून यापूर्वी शहराचे व्यवस्थापन ग्रामपंचायतच्या माध्यमातून केले जात होते.पलूस ग्रामपंचायतीच्या कार्यकाळापासून ते आजवर सन 1997 ते 2013 पासून 21 कर्मचारी हे आरोग्य, पाणीपुरवठा व विद्युत विभागात काम करून पलूस शहराची सेवा बजावत असताना शासनाच्या नियमावलीप्रमाणे कर्मचाऱ्यांचे कायमसेवेत समावेशन करताना जुन्या कर्मचाऱ्यांना प्रथम प्राधान्य न देता 2013 नंतर सेवेत रुजू असलेल्या काही कर्मचाऱ्यांचे समावेशन करत पलूस नगरपरिषदेने जुन्या तब्बल 21 कर्मचाऱ्यांवर जाणीवपूर्वक अन्याय केलेला आहे. याबाबत जुने कर्मचारी सातत्याने पाठपुरावा करत असून नगरपरिषद प्रशासन जाणीवपूर्वक दखल घेत नसलेने अन्यायग्रस्त 21 कर्मचाऱ्यांनी वंचित बहुजन आघाडी या पक्षाने याबाबत पाठपुरावा करून आम्हास न्याय मिळवून द्यावा यासाठीचे लेखी पत्र दिले असलेने वंचित बहुजन आघाडी कर्मचाऱ्यांच्या न्याय व हक्कासाठी पाठपुरावा करून या 21 कर्मचाऱ्यांना कायमसेवेत समावेशन करणेसाठी आवश्यकता भासलेस तीव्र आंदोलन करणार असलेची माहिती गायगवाळे यांनी दिली. यावेळी पलूस शहराध्यक्ष अमित बनसोडे तसेच तालुका महासचिव विनीत कांबळे यांसह पदाधिकारी उपस्थित होते.

संबंधित बातम्या
वसंतराव काळे प्रशालेच्या मुलींच्या खो-खो संघाला तिहेरी मुकुट
*ज्येष्ठांचा सन्मान घोषणामध्ये नव्हे, जगण्यात दिसायला हवा !सादिक खाटीक
१ ऑक्टोबरला !आमदारांच्या दारात “पिठलं -भाकरी ठिय्या आंदोलन!”सादिक खाटीक यांची माहिती