राजेश पहाडन यांचे मुंबई येथे कोरोनाने निधन

 रत्नदीप तंतरपाळे 

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/ चांदूर बाजार (कृष्णापुर)अमरावती: 

बहुजन समाज पार्टीचे निष्ठावान,स्वाभिमानी कार्यकर्ता कालकथीत राजेश राजेश पहाडन यांचे मुंबई येथे कोरोनाशी लढत असताना दु:खद निधन झाले.राजेश पहाडन यांचा जन्म लसनापुर ता.चांदुर बाजार जि.अमरावती येथे झाला.प्राथमिक शिक्षण लसणापुर येथेच झाले.त्यानंतर उच्च शिक्षण घेण्यासाठी ते औरगांबाद येथे केले.पुढील व्यवसाय करण्याकरिता मुंबई येथे गेले. या  दरम्यान त्यांनी बहुजन समाज पार्टीमध्ये काम करणे सुरू केले.बरेच वेळा त्यांची बहन कु.मायावतीजी सोबत मुलाखात झाली. बसपाचे कँडर कँम्प घेत असतांना त्यांचा फार जवळून अनुभव आला. ते कुर्हा जि.प. सर्कल मधून बसपा उमेदवार म्हणुन सुध्दा निवडणुक लढले होते.अचलपुर व दर्यापुर विधानसभेत त्यांचे फार मोठे मोलाचे योगदान होते.त्यांच्या मागे आई,वडील,एक भाऊ व दोन मुली  व पत्नी हा परिवार आहे.त्यांचे दु;खद निधन झाल्यामुळे बसपाला  तसेच अचलपुर व दर्यापुर विधानसभेतील कार्यकर्त्यांना फार मोठे दु:ख झाले.त्यांना अचलपुरतर्फे त्यांना राजेद्र डोंगरे,वरिष्ठ बसपा नेते,शिरीष भाऊ गवई जिल्हा सचिव अम.बसपा.जी.एस.खांडेकर,अध्यक्ष ,अचलपुर विधानसभा बसपा भावपुर्ण श्रध्दांजली वाहिली.