मोहनराव पुजारी
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/ आटपाडी:
नाभिक,चर्मकार व होलार समाजाजातील बांधवांना तसेच हातावरचे पोट असणारे शेतकरी व मजूरांना लाॅकडाऊनमध्ये आर्थिक सहाय्य मिळणे अत्यावश्यक आहे, अशी आग्रही मागणी सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री व महाराष्ट्र राज्याचे जलसंपदामंत्री जयंतराव पाटील यांच्याकडे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव प्रा.नारायण खरजेव पदाधिकारी यांनी केली आहे. लाॅकडाऊनमुळे बरेच छोटे उद्योग-व्यावसायिक यांना आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे. त्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत जिल्ह्यातील तालुकानिहाय नाभिक, चर्मकार, होलार समाजबांधवांना व हातावरचे पोट असणाऱ्या मजूरांना आर्थिक सहाय्य मिळणे गरजेचे आहे. लाॅकडाऊनचा खरा त्रास या छोट्या व्यावसायिकांना होतोय, या प्रत्येक संघटनेच्या जिल्हाध्यक्षांना संपर्कात घेऊन हा प्रश्न सोडविणे महत्वाचे आहे. गेल्या वर्षभरापासून त्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे. त्यांचे कुटूंब सांभाळण्यासाठी खरी गरज आता आहे.या सर्वसामान्य कुटुंबांना न्याय मिळवून द्यावा, अशी आग्रहाची मागणी जयंतराव पाटील यांच्याकडे प्रा.नारायण खरजे व पदाधिकारी यांनी केली आहे.

संबंधित बातम्या
औषध विक्री दुकानांत सीसीटीव्ही बसवण्याचे आवाहन
सांगली जिल्ह्याच्या विकासासाठी वाढीव निधी देऊ – उपमुख्यमंत्री अजित पवार
दहिवडी न्यायालयाच्या वतीने राष्ट्रीय लोकअदालतीचे यशस्वी आयोजन