जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेशांना 15 मे पर्यंत मुदतवाढ

प्रगल्भ नायक न्यूज नेटवर्क/ सांगली : 

जिल्ह्यात कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादूर्भावास आळा बसण्यासाठी प्रतिबंधात्मक आदेश (ब्रेक दि चेन ऑर्डर) दि. 1 मे 2021 रोजीचे सकाळी 7 वाजेपर्यंत पारित करण्यात आलेले आहेत. राज्यशासनाकडील आदेशानुसार जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी प्रतिबंधात्मक आदेशांना दि. 15 मे 2021 रोजीचे सकाळी 7 वाजेपर्यंत मुदतवाढ दिली आहे.

 सूट देण्यात आलेल्या आस्थापनांनी, शासनाने त्या – त्या विभागासाठी, आस्थापनांसाठी नेमून दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे बंधनकारक राहील. या आदेशाची अंमलबजावणी पोलीस अधिक्षक, इंन्सिडंट कमान्डर तथा तालुका कार्यकारी दंडाधिकारी, स्थानिक स्वराज्य संस्था, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ व सर्व संबंधित प्रशासकीय विभाग प्रमुख यांनी करावी. आदेशाचे पालन न करणाऱ्या कोणत्याही व्यक्ती अथवा संस्थेवर भारतीय दंड संहिता 1860, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 व साथ रोग नियंत्रण कायद्यातील तरतुदीप्रमाणे फौजदारी तसेच दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी जारी केले आहेत.