ई-पाससाठी कोविड निगेटीव्ह प्रमाणपत्राची गरज नाही: एस.पी.दीक्षित गेडाम

स्वयंघोषणापत्र अथवा डॉक्टरांचे कोविड लक्षणे नसल्याचे प्रमाणपत्र पुरेसे

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
सांगली :

 जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. त्याअनुषंगाने राज्य शासनाची ब्रेक द चेन चे निर्बंध लागू आहेत व अंमलात आहेत.  त्याअनुषंगाने अंतरजिल्हा हालचालीवर बंदी घालण्यात आली आहे. अत्यावश्यक सेवेच्या वाहतुकीसाठी कोणत्याही प्रकारची ई-पास ची गरज नाही. पण जर एखाद्या व्यक्तीला अत्यावश्यक कारणासाठी जिल्ह्याबाहेर जाण्याची गरज आहे तर त्यासाठी ई-पास बंधनकारक आहे. ई-पास साठी अर्ज करताना कोणत्याही प्रकारच्या कोविड निगेटीव्ह रिपोर्ट ची आवश्यकता नाही. ई-पास साठी अर्ज करताना केवळ स्वयंघोषणापत्र अथवा कोणत्याही डॉक्टरचे कोविड-19 ची लक्षणे नसल्याचे प्रमाणपत्र पुरेसे आहे. अशी माहिती जिल्हा पोलीस अधिक्षक दीक्षित गेडाम यांनी दिली. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा पोलीस अधिक्षक दीक्षित गेडाम यांनी केले आहे.