अनिल मदने
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/जत:
कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण राज्यात काही कालावधीकरीता लॉकडाऊन घोषित केला असल्याने संचारबंदीच्या काळात जीवनावश्यक सेवांचा भाग म्हणून महाराष्ट्र शासनाकडील नियमीत स्वरुपातील स्वस्त दरातील धान्य हे रास्त भाव धान्य दुकानदारांमार्फत मोफत स्वरुपात देणेचे आदेश आहेत. त्यानुसार माहे मे २०२१ करिता तालुक्यातील अन्नसुरक्षा व अंत्योदय लाभार्थीना ऑनलाईन प्रणालीव्दारे पॉस मशिनवरुन ग्राहकांचा अंगठा रजिस्टर करून मोफत धान्य वितरीत केले जाणार आहे. सदरचे धान्य हे नियमीत प्रमाणानुसारच प्रति माणसी गहु ३ व तांदुळ २ असे एकूण ५ किलो अन्नसुरक्षा लाभार्थी यांना तर अंत्योदय लाभार्थी कार्डधारकांना नियमीत प्रमाणानुसार गहू २५ व तांदुळ १० असे प्रति कार्डधारकास ३५ किलो धान्य वितरण केले जाणार असल्याची माहिती तहसीलदार सचिन पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली. याशिवाय केंद्र शासनाकडील पंतप्रधान गरीब कुटुंब कल्याण योजनेव्दारे मागिल वर्षीप्रमाणे यावर्षी माहे मे व माहे जून २०२१ करीता अन्नसुरक्षा व अंत्योदय लाभार्थीना ऑनलाईन प्रणालीव्दारे पॉस मशिनवरुन ग्राहकांचा अंगठा रजिस्टर करून प्रति मानसी गहु ३ किलो व तांदुळ २ किलो असे एकूण ५ किलो मोफत धान्य वितरीत केले जाणार आहे. माहे मे व जुन २०२१ करीता केंद्र शासनाचे PMGKY योजनेच्या मोफत लाभाव्यतिरिक्त महाराष्ट्र शासनाकडील नियमित स्वस्त दरातील धान्य माहे मे २०२१ मध्ये मोफत तर माहे जून २०२१ करीता नियमित स्वस्त दराने वितरीत केले जाणार आहे. सदर योजनेचा लाभ जत तालुक्यातील १७७ दुकानदारांमार्फत वितरीत केला जात असून जेलाभार्थी अन्नसुरक्षा व अंत्योदय योजनेतील आहेत, त्यांनाच सदरचा स्वस्त व मोफत धान्य लाभ वितरीतकरणेत येणार आहे. तालूक्यात एकूण अन्नसुरक्षा व अंत्योदय योजनेचे ऑनलाईन लाभार्थी (पॉस मशिन वर नोदं असलेले) प्राधान्य गट (अन्नसुरक्षा योजना) कार्डधारक ४७११७ असून त्यातील कार्ड सदस्य संख्या २२२६४९ इतकी ऑनलाईन नोंद आहे. तर अंत्योदय योजना ऑनलाईन कार्डधारक (पॉस मशिन वर नोदं असलेले) २९६१असून त्यातील सदस्य संख्या १३८६६ इतकी आहे,यांना मोफत धान्य लाभ वितरण करणेत येणार आहे. तरी तालुक्यातील योजनापात्र लाभार्थी यांनी आपले गावातील रा.भा.दुकानदारांकडून इपॉस मशीनव्दारे शासन नियमानुसार मुदतीत धान्य प्राप्त करुन घ्यावे. या कामी कुणीही दुकानाजवळ गर्दी करु नये. सोशल डिस्टन्सींग नियमाचे पालन करावे. मास्कचा वापर करावा. काही तक्रार असलेस स्थानिक ग्रामदक्षता समिती यांचेकडे संपर्क साधावा, असे आवाहन जत तहसिलदार सचिन पाटील यांनी पत्रकांव्दारे केले आहे.

संबंधित बातम्या
औषध विक्री दुकानांत सीसीटीव्ही बसवण्याचे आवाहन
सांगली जिल्ह्याच्या विकासासाठी वाढीव निधी देऊ – उपमुख्यमंत्री अजित पवार
दहिवडी न्यायालयाच्या वतीने राष्ट्रीय लोकअदालतीचे यशस्वी आयोजन