वीज पडून तीन जनावरांचा मृत्यू!

 २ लाख ५ हजार रुपयांचे नुकसान
अनिल मदने

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/जत:

जत तालुक्यात गोंधळवाडी,लकडेवाडी,जाडरबोबलाद येथे वीज पडून तीन जनावरांचा मृत्यू झाला.यामध्ये २ लाख,५ हजार रुपयांचे नुकसान झाले.नुकसानीचा पंचनामा केला आहे.तालुक्यात सोमवारी विजेचा कडकडाट, ढगांच्या गडगडासह दुपारी ४ नंतर अचानक ढगांची दाटी झाली.काल रात्रभर झालेल्या वळीव पावसामुळे व वादळी वाऱ्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.गोंधळेवाडी येथील शेतकरी निल्लव्वा मायप्पा पांढरे यांंच्या म्हैसीवर वीज पडून मृत्यू झाला. ७० हजार रुपयांचे नुकसान झाले.जाडरबोबलाद येथील शेतकरी परशुराम शिवप्पा ऐनापुरे यांची गायीचा मृत्यू झाला.त्यात ७० हजार रुपयांचे नुकसान झाले. लकडेवाडी येथील शिवाजी सुखदेव लकडे यांची गायीचा वीज पडून मृत्यू झाला.६५ हजार रुपयांचे नुकसान झाले.    गोंधळेवाडी ,जाडरबोबलाद ,लकडेवाडी येथे प्रत्यक्ष पाहणी करुन पंचनामा केला.जाडरबोबलादचे तलाठी विनायक बालटे,लकडेवाडीचे नितीन कुंभार,संखचे राजेश चाचे,गणेश पवार ,राहूल कोळी  यांनी पंचनामा केला.