मोहनराव पुजारी
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/आटपाडी:
सांगली जिल्हा भाजपा ओबीसी मोर्चाच्यावतीने जिल्हाध्यक्ष विलासराव काळेबाग यांच्या नेतृत्वाखाली बारा बलुतेदारांच्या उदरनिर्वाहासाठी सरकारने प्रत्येक कुटुंबाला 5000 रु.आर्थिक मदत करावी,यासाठी आटपाडीत नायब तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. यावेळी भाजपाचे जिल्हा चिटणीस प्रमोद धायगुडे, आटपाडी तालुका अध्यक्ष उमाजी सरगर,भाजपा युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष प्रणव गुरव, भाजपा नेते जयवंतराव सरगर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक विष्णू अर्जुन,रामचंद्र चोपडे, आंबेवाडीचे उपसरपंच वसंत अर्जुन,विलास जानकर,दत्ता पुकळे, प्रकाश शिंदे,अमोल सावंत, प्रशांत शिंदे, रविंद्र ठोंबरे उपस्थित होते.५ एप्रिल 2021 पासून राज्यात लॉकडाऊन जाहीर केले. या लॉकडाऊनमध्ये जीवनावश्यक वस्तुंची दुकाने सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आलेली आहे. परंतु न्हावी, सुतार, कुंभार, शिंपी, परीट, इत्यादी १२ बलुतेदारांमधील छोट्या जातीतील परंपरागत व्यवसाय पूर्णतः बंद आहे. त्यामुळे आधीच गरीब परिस्थिती असलेला हा समाज लॉकडाऊनमुळे अधिक जास्त आर्थिक अडचणीत आलेला आहे. एकप्रकारे या समाजावर उपासमारीची पाळी आलेली आहेॉ सरकारने लाॅकडाऊन जाहीर करताना ऑटो रिक्षा चालक, बांधकाम मजूर, फेरीवाले इत्यादी लोकांकरिता आर्थिक साहाय्य जाहीर केले. परंतु न्हावी, सुतार, शिंपी, कुंभार, परीट इत्यादी १२ बलुतेदारांसाठी कुठलेही आर्थिक साहाय्य जाहीर केले नाही.सरकारने राज्यातील १२ बलुतेदारांबाबत सहानुभूतीपूर्वक विचार करून १२ बलुतेदारांमधील परंपरागत व्यवसायिकांना प्रति कुटूंब किमान ५०००/- रुपये आर्थिक साहाय्य करावे अशी मागणी करण्यात आली आहे.तसेच जिल्ह्यात कोरोना रुग्णाच्याबाबतीत बेड उपलब्ध होत नाहीत. याकरिता कोविड केअर सेंटर तालुकास्थानी सुरू करून कोरोना रुग्णांची व्यवस्था व उपचार कसे चांगले होईल, याबाबत शासन स्तरावर प्रयत्न करावेत अशीही मागणी करण्यात आली आहे.

संबंधित बातम्या
औषध विक्री दुकानांत सीसीटीव्ही बसवण्याचे आवाहन
सांगली जिल्ह्याच्या विकासासाठी वाढीव निधी देऊ – उपमुख्यमंत्री अजित पवार
दहिवडी न्यायालयाच्या वतीने राष्ट्रीय लोकअदालतीचे यशस्वी आयोजन