सरकारच्या निषेधार्थ पत्रकारांचे आज आंदोलन

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/मुंबई,दि.२७:

 गेल्या वर्षी टाळेबंदी सुरू झाल्यानंतर आणि आताची टाळेबंदी  जाहीर होण्याच्या आधीपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमात काम करणाऱ्या पत्रकार आणि पत्रकारित्तेर कर्मचाऱ्यांना लोकलमधून कार्यालयीन कामासाठी फिरण्याची मुभा मिळावी, यासाठी एनयुजेमहाराष्ट्र, मुंबई मराठी पत्रकार संघासह विविध पत्रकार संघटना राज्य सरकारसोबत पत्रव्यवहार करीत आहेत.                                    मात्र राज्य शासन पत्रकारांच्या मागणीकडे गांभीर्याने पाहत नाही. अत्यावश्यक सेवेतील कोरोना योद्धे असणाऱ्या लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाच्या संचार व अभिव्यक्ती स्वातंत्र्याची ही गळचेपी आहे! पत्रकारांच्या मागण्यांवर चर्चा सुरू असल्याचे सांगून राज्य सरकार वेळकाढू धोरण अवलंबत आहे.  शासनाची ही भूमिका निषेधार्ह असून आज मंगळवार दिनांक 27 एप्रिल रोजी दुपारी 2  वाजता मुंबई मराठी पत्रकार संघाच्या पत्रकार भवन परिसरात  पत्रकारांचे विविध मागण्यांसाठीचे आंदोलन सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून होणार आहे.                    या आंदोलनात सर्व पत्रकार संघटना आणि पत्रकारांनी सहभागी व्हावे असे आवाहन मुंबई मराठी पत्रकार संघ व एनयुजेमहाराष्ट्र ने केले आहे.