बारा बलुतेदारांना आर्थिक पॅकेज जाहीर करा : डॉ. आप्पासाहेब देशमुख

संजय हुलगे
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/माळशिरस :
 

राज्यातील वाढत्या कोविड१९ प्रादुर्भावामुळे संपूर्ण राज्यात लॉकडाऊन घोषित करण्यात आले . अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने व्यवसाय बंद करण्यात आले. छोटे व्यावसायिक जे पारंपारिक आपले व्यवसाय उदा.नाभिक,शिंपी,कुंभार,परीट इ. व्यवसाय करणारे राज्यातील १२ बलुतेदार यांचे व्यवसाय बंद झाले. आधीच गरिबी आणि असा लॉकडाउन यामुळे हे व्यावसायिक आर्थिक संकटात आले आहेत.त्यांच्यावर व त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. सरकारने लॉकडाउन जाहीर केला. त्यावेळी ऑटो रिक्षाचालक,बांधकाम मजूर,फेरीवाले इ. लोकांना आर्थिक सहाय्य जाहीर केले.परंतु समाजातील या १२ बलुतेदारांकडे कोणाचे लक्ष नाही गेले. त्यांना कुठल्याही प्रकारचे आर्थिक सहाय्य केले नाही. म्हणजे गरीबाचा कोणच वाली नाही.   सरकारने राज्यातील या १२ बलुतेदारांना,पारंपारिक व्यवसाय करणाऱ्याना प्रत्येक कुटुंबास कमीत कमी ५०००/- रु एवढे आर्थिक सहाय्य करावे. तसेच जिल्ह्यातील वाढत्या कोरोना रुग्णामुळे बेडची कमतरता खूप भेडसावत आहे.तरी त्यासाठी कोविड१९ केअर सेन्टर तालुक्याच्या ठिकाणी सुरू करावे,म्हणजे रुग्णांना योग्य ती व्यवस्था व उपचार कसे योग्य मिळेल याचा शासन स्तरावर प्रयत्न करावेत,असे निवेदन संपूर्ण राज्यात भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्च्याच्या वतीने व योगेश आण्णा टिळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण महाराष्ट्रात जिल्हा अधिकारी व तहसीलदार यांना देण्यात आले .