भिक मागा..चोरी करा.. उधार आणा!ऑक्सिजन पुरवून लोकांचे जीव वाचवा!
दिल्ली उच्च न्यायालयाने सुनावणीवेळी सरकारला सुनावले
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/दिल्ली:
‘काहीही करा,पण नागरिकांना वेळेत ऑक्सिजन उपलब्ध करून द्या’, असे फर्मान सोडत दिल्ली उच्च न्यायालयाने मोदी सरकारला ‘भिक मागा, उधार आणा, नाहीतर चोरी करा… हा राष्ट्रीय आणीबाणीचा प्रसंग आहे, लोकांचे जीव वाचवण्यासाठी ऑक्सिजन उपलब्ध करा’ असे बुधवारी सुनावले आहेत.
संकटाच्या वेळी नागरिकांना ऑक्सिजन आणि इतर वैद्यकीय सुविधा पुरवण्याची जबाबदारी ही सर्वस्वी सरकारची आहे. असे अधोरेखित करत दिल्ली उच्च न्यायालयाने मोदी सरकारला सुनावले आहे.
देशामध्ये कोरोनाने गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. रुग्णांसाठी ऑक्सिजनची गरज वाढली आहे.
दिल्लीतील मॅक्स हॉस्पिटलने दिल्ली उच्च न्यायालयात ऑक्सिजनचा अपुरा पुरवठा संदर्भात याचिका दाखल केली होती. त्याची सुनावणी बुधवारी झाली.त्यावेळी उच्च न्यायालयाने सरकारला हा सल्ला दिला. न्यायमूर्ती विपिन संघी व रेखा पाटील यांच्या खंडपीठासमोर मॅक्स हेल्थकेअरच्या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्यात आली.ऑक्सिजनचा अपुरा पुरवठा होत असल्याची तक्रार याचिकेमध्ये दाखल केली होती. सुनावणी सुरू करताना तीन तास पुरेल इतकाच ऑक्सिजनचा साठा शिल्लक असून चारशे रुग्णांचा जीव धोक्यात आला असल्याचे मॅक्सने सांगितले.यातील 262 कोरोनाचे रुग्ण असल्याचे स्पष्टीकरणही मॅक्सने केले.या सुनावणीवर उच्च न्यायालयाने ‘लोकांचे जीव महत्त्वाचे असून काहीही करून लोकांचे जीव वाचवा, सरकारच्या स्रोतांमधून ऑक्सिजनची गरज भागत नसल्यास सरकारने दुसऱ्या मार्गाने ऑक्सिजन पुरवठ्याची सोय करावी’ असे म्हटले आहे.

संबंधित बातम्या
वसंतराव काळे प्रशालेच्या मुलींच्या खो-खो संघाला तिहेरी मुकुट
*ज्येष्ठांचा सन्मान घोषणामध्ये नव्हे, जगण्यात दिसायला हवा !सादिक खाटीक
१ ऑक्टोबरला !आमदारांच्या दारात “पिठलं -भाकरी ठिय्या आंदोलन!”सादिक खाटीक यांची माहिती