संजय हुलगे
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/माळशिरस:
माळशिरस तालुक्यातील मांडवे येथे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतीबा फुले व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहपूर्ण वातावरणात आणि शासनाने घालुन दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करून साजरी करण्यात आली.
यावेळी या महापुरुषाच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबीराचेही आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी १०७ लोकांनी रक्तदान केले. तर गावात कोरोनासारख्या महामारीने थैमान घातले असताना त्यावर आळा घालण्यासाठी गावामधील २७३ लोकांच्या रॅपिड टेस्ट करण्यात आल्या.४५ लोकांना लसीकरण करण्यात आले.
याप्रसंगी प्रथमतः महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन नातेपुते पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक मनोज सोनवलकर, सरपंच हनुमंत टेळे,उपसरपंच पंचशीला गायकवाड व तात्याबा गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी गावातील विविध संघटनेचे पदाधिकारी व फुले,शाहू,आंबेडकर जयंती समितीचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.

संबंधित बातम्या
प्रवीण बागड़े यांना माफसूचा उत्कृष्ट अधिकारी पुरस्कार प्रदान
कुसमोड येथील कैलास घोंगडे या शेतकऱ्याच्या गाईवर तरसाच्या हल्लयात गाईचा मृत्यू
येळावीत रक्तदान शिबिरास युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद