मोफत शिवभोजन थाळी वाटप योजनेचे महाराष्ट्र कामगार सेनेमार्फत उदघाटन

अनिल मदने
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/जत:

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकतेच जाहीर केलेप्रमाणे कोरोना महामारीच्या पुनश्च संकटकाळी लॉकडाऊन कालावधीसाठी सर्व तळागाळातील गोरगरिबांना जेवणाची व्यवस्था व्हावी म्हणून मोफत शिव भोजन थाळी योजना जाहीर केली आहे.त्याची अंमलबजावणी आज रोजी जत एस.टी आगारामध्ये महाराष्ट् कामगार सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष दिनकर पतंगे,आगारप्रमुख घोगरे, महाराष्ट्र कामगार सेना तालुका प्रमुख सुरेश घोडके,शाखाप्रमुख,अर्जुन भोसले शंकर कॉलिनी, जत, शाखाप्रमुख, तुकाराम आरसुळे, सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र आरळी,एम.जगदीश,पुकार आवटी, पत्रकार नजीर भाई चटर्की यांच्या हस्ते गरीब प्रवाशांना व नागरिकांना मोफत शिवभोजन थाळीचे वाटप करण्यात आले.या योजनेचा लाभ प्रवाशांनी जरूर घ्यावा असे आव्हान दिनकर पतंगे यांनी केले.
यावेळी आगार प्रमुख घोगरे यांनी मुख्यमंत्री व महाराष्ट्र शासनाचे आभार मानले. पुकार आवटी यांनी सर्वांचे आभार मानले.दीपक माने या एका गरीब प्रवाशाने मुख्यमंत्री यांनी आम्हा गरिबांची दखल घेतली, त्यांना मी शतशः धन्यवाद देतो असे सांगितले.