आशा व गटप्रवर्तक यांना सेवेत कायम करा:खा.संजय पाटील यांच्याकडे युनियनची मागणी

अनिल मदने

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/जत : 

डफळापूर येथे खासदार संजयकाका पाटील यांना आशा व गटप्रवर्तक यांना सेवेत कायम करण्यात यावे, यासाठी लाल बावटा आशा वर्कर्स व गटप्रवर्तक युनियनच्यावतीने निवेदन देण्यात आले.आशा व गटप्रवर्तक या कोरोनाच्या महामारीमध्ये आपल्या जीवाची पर्वा न करता अहोरात्र काम करत आहेत.पण त्यांच्या कामाला काही मोल नाही.आपण एक कृतिशील खासदार आहात. जसे की डॉ.अमोल कोल्हे यांनी लोकसभेत आशा व गटप्रवर्तक यांना सेवेत रुजू करून घ्यावे असे आवाहन केले होते. त्यांचप्रमाणे आपणही केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ.हर्षवर्धन यांच्याकडे पाठपुरावा करावा की देशभरात जवळपास ९ लाख आशा व गटप्रवर्तक भगिनी काम करत आहेत व महाराष्ट्रामध्ये ७० हजार आशा व ३५०० गटप्रवर्तक या काम करत आहेत.पण त्यांचे काम हे  मोबदला वर आहे.तरी आपण स्वतः लक्ष घालून आशा स्वयंमसेविका व गटप्रवर्तक यांना सेवेत कायमस्वरूपी करावे, यासाठी प्रयत्न करावा व आशा व गटप्रवर्तक भगिनींना न्याय मिळवून द्यावा असे निवेदनात म्हटले आहे.यावेळी जिल्हाध्यक्ष कॉ.मिना कोळी,जिल्हा संघटक कॉ.हणमंत कोळी,नजमा शेख आदि उपस्थित होते.