बसर्गी येथे वीज पडून दोन म्हैशीचा मृत्यू ; ७५ हजाराचे नुकसान

अनिल मदने 
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/ जत:

बसर्गी ता.जत येथे मंगळवारी दुपारी तीन वाजण्याच्या दरम्यान वाऱ्यासह आलेल्या पावसात वीज पडून कल्लाप्पा सिद्राया तांवसी यांच्या दोन म्हैशीचा मृत्यू झाला आहे. त्यांचे बाजारभावाप्रमाणे अंदाजे ७५ हजाराचे नुकसान झाले आहे.
अधिक माहिती अशी की,कल्लाप्पा सिद्राया तांवसी यांची बसर्गी येथील तावशीमळा येथे मंगळवारी  दुपारी तीनच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पडलेल्या पावसात वीज पडून अंदाजे ७५ हजार रु किमतीच्या दोन दुभत्या म्हैशीचा मृत्यू झाला. या अपघाती घटनेमुळे तावसी कुटूंबावर आर्थिक संकट कोसळले आहे.
या घटनेची माहिती मिळताच गावकामगार तलाठी ,पोलीस पाटील व सरपंच यांनी भेट देऊन नुकसानीची पाहणी व पंचनामा केला आहे.