रेठरेहरणाक्ष येथे आरोग्यसेवा वाहन लोकार्पण सोहळा व ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्राचे उद्घाटन संपन्न

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/सांगली:
   रेठरेहरणाक्ष येथील पट्टे बापूराव ज्येष्ठ नागरिक संस्थेने गावातील गोरगरीब जनतेसाठी आरोग्यसेवा वाहन गावच्या लोकवर्गणीतून खरेदी केले. त्याचा लोकार्पण सोहळा तालुक्यातील उद्योगपती व समाजसेवक सर्जेराव यादव यांच्या हस्ते संपन्न झाला. तसेच ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्राचे उद्घाटन तालुक्याचे सहाय्यक गट विकास अधिकारी अजिंक्य कुंभार यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. इस्लामपूर येथील बाल विकास प्रकल्प अधिकारी वैभव कांबळे व करवीरचे बाल विकास प्रकल्प अधिकारी बुधावले, अर्थक्रांतीचे कडेगाव तालुका अध्यक्ष विठ्ठल पाटील उर्फ फडणीस नाना, सरपंच कुमार कांबळे,पोलीस पाटील उपस्थित होते.याप्रसंगी कुंभार यांनी विरंगुळा केंद्राच्या वाचनालयासाठी मदत करण्याचे आश्वासन दिले,तसेच केंद्राचे राहिलेले काम करण्याचेही आश्वासन दिले.
सर्जेराव यादव यांनी विरंगुळा केंद्रासाठी सहा सिमेंटची  बाकडी भेट दिली आहेत. तसेच करत असलेले हे काम निरपेक्ष हेतूने करत आहात व जेष्ठांसाठी करत आहात,त्यामुळे आपण या वाचनालयासाठीही मी मदत करणार आहे,असे मनोगत व्यक्त केले.
याप्रसंगी जगन्नाथ मोरे पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले.यामध्ये त्यांनी गावात कोरोना काळात वाडी-वस्त्यांवर केलेली औषध फवारणी,कोरोना रुग्णांसाठी ऑक्सिजनची दोन मोठी सिलेंडर गावस्वरूपी वापरण्यासाठी दिलेले आहेत. तसेच युज अँड थ्रो ची पन्नास गॅस सिलेंडर गावात  कोविड पेशंटना मोफत भेट दिलेले आहेत.तसेच त्यांनी ज्येष्ठ नागरिकांच्या व्यथा,अडचणी मांडल्या.अर्थक्रांती याविषयी सविस्तर माहिती दिली.जेष्ठांना सन्मानधन मिळाले पाहिजे,ॲट्रॉसिटीसारखा कायदा त्यांच्यासाठी झाला पाहिजे,तालुका आरोग्य केंद्र तयार केली पाहिजेत,अशा पद्धतीच्या मागण्या मांडल्या.
डी.के.मोरे यांनी पट्टे बापूराव ज्येष्ठ नागरिक संस्था  गावात छोटी-मोठी कामे करीत आहे व त्यासाठी मार्गदर्शन करण्याचे आवाहन केले.
चंद्रशेखर मोरे यांनी प्रारंभी आपले मनोगत व्यक्त  करून कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले व त्यांनी शेवटी सर्वांचे आभार मानून कार्यक्रम संपन्न झाला.
याप्रसंगी पट्टे बापूराव ज्येष्ठ नागरिक संस्थेचे कार्यकर्ते  निवास शिंदे,किसन सावंत,एन.डी.माने,निवृत्ती पवार, बाळासो मदने,शहाजी सत्रे,वसंत पवार,पोपट बेले, भास्कर बेले,विलास माळी,मोहन काळे,बाळासो कांबळे,दीपक गुरव,दादासो कोळेकर,नितीन शिंदे, हुसेन अकोळकर,संपतराव शिंदे,दिनकर पवार,हिराबाई  घेवदे हिराबाई मोरे,अनुसया बेंदूगडे, प्रभावती जाधव, बनुबाई निकम,पुष्पा पवार, सुशीला ठाकर, व धोंडूबाई घेवदेे हजर होते.