प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/सांगली:
सांगली जिल्ह्यामध्ये कोणतीही पूर्वकल्पना न देता लॉकडाऊनच्या नावाखाली बाजारपेठा बंद केल्या असलेने व्यापाऱ्यांमध्ये सरकारविषयी असंतोष आहे, लॉकडाऊन विरोधात भूमिका घेत दुकाने उघडणाऱ्या व्यापाऱ्यांच्या पाठीशी वंचित बहुजन आघाडी ठामपणे उभा राहणार असलेचे निवेदन आज जिल्हाधिकाऱ्यांना युवा नेते राजेश गायगवाळे यांसह शिष्टमंडळाच्या वतीने देणेत आले.
निवेदनात म्हटले आहे कि,महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट वेगाने येणार असल्याचा इशारा WHO सह अन्य संस्थानी दिला होता.मात्र मागील दोन महिन्यात राज्य सरकारने याकडे गांभीर्याने न पाहता सचिन वाझे, अनिल देशमुख व संजय राठोड ही प्रकरणे गांभीर्याने घेतली होती.त्यामुळेच सरकारच्या अपयशामुळे कोरोना रुग्णांच्या संख्येत प्रचंड प्रमाणात वाढ होत असताना सरकारने हे अपयश लपविण्यासाठी लॉकडाऊन घोषित केला आहे.
त्याचप्रमाणे प्रथम रात्रीच्या संचारबंदीची घोषणा करत अचानक व्यापाऱ्यांना प्रशासनाकडून दुकाने बंद करण्यात आली.लॉकडाऊन करताना शेतकरी, कष्टकरी, व्यापारी यांचा कोणताच विचार सरकारने केला नाही.तसेच मागील वर्षाच्या लॉकडाऊनमुळे व्यापाऱ्यांची झालेली हानी,जखमा ताज्या असतानाच जाहीर केलेल्या लॉकडाऊनबाबत शासनाने पुन्हा विचार करून कडक निर्बंध घालून योग्य ती नियमावली आखत व्यापाऱ्यांना दिलासा द्यावा असेही निवेदनात म्हटले आहे.
लॉकडाऊन झुगारून जे व्यापारी दुकाने उघडणार असतील,त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहण्याची वंचित बहुजन आघाडी पक्षाची भूमिका असलेचे राष्ट्रीय नेते बाळासाहेब आंबेडकर यांनी स्पष्ट केले आहे. सांगली जिल्ह्यातील लॉकडाउनबाबत फेरविचार करत योग्य निर्बंध घालून व्यापाऱ्यांना दुकाने सुरु करण्याची परवानगी द्यावी अन्यथा लॉकडाऊन झूगारणाऱ्या व्यापाऱ्यांच्या पाठीशी वंचित बहुजन आघाडी ठामपणे राहील असे युवा नेते राजेश गायगवाळे यांनी सांगितले.यावेळी डॉ. राजेश साठे, अमित बनसोडे, मुरलीधर बनसोडे उपस्थित होते.

संबंधित बातम्या
औषध विक्री दुकानांत सीसीटीव्ही बसवण्याचे आवाहन
सांगली जिल्ह्याच्या विकासासाठी वाढीव निधी देऊ – उपमुख्यमंत्री अजित पवार
दहिवडी न्यायालयाच्या वतीने राष्ट्रीय लोकअदालतीचे यशस्वी आयोजन