
मोहनराव पुजारी
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/आटपाडी:
आटपाडी पंचायत समिती कार्यालय येथे थोर साहित्यिक शंकरराव खरात यांच्या स्मृतिदिनानिमित्त प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.
माणदेशामध्ये जन्माला आलेले रत्न, ज्यांनी आपल्या माणदेशी भाषेत जगलेलं,अनुभवलेलं विश्व साहित्याच्या रुपात जगाला खुल केलं,असे मराठी साहित्य संमेलनचे माजी अध्यक्ष तथा डॉ.बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ औरंगाबादचे माजी कुलगुरू
डॉ.शंकरराव खरात यांच्या स्मृतिदिनानिमित्त आटपाडी पंचायत समितीच्या सभापती सौ.पुष्पाताई जयवंतराव सरगर यांनी प्रतिमेस पुष्पहार घालून
अभिवादन केले.
यावेळी उपसभापती दादासाहेब मरगळे, युवा नेते जयवंतभाऊ सरगर, नाना झुरे, बाळासाहेब ठोंबरे, प्रशांत चंदनशिवे,सरस पुजारी सदस्या ग्रामपंचायत आंबेवाडी, मनीषा बालटे, रेश्मा बालटे, यमगर मॅडम , व इतर मान्यवर उपस्थित होते.

संबंधित बातम्या
औषध विक्री दुकानांत सीसीटीव्ही बसवण्याचे आवाहन
सांगली जिल्ह्याच्या विकासासाठी वाढीव निधी देऊ – उपमुख्यमंत्री अजित पवार
दहिवडी न्यायालयाच्या वतीने राष्ट्रीय लोकअदालतीचे यशस्वी आयोजन